हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये सीएनजी कार आणि सीएनजी रिक्षाला मोठी मागणी आहे. त्यामुळे आता पहिल्यांदाच भारतात येत्या 18 जून रोजी जगातील पहिली सीएनजी बाईक (CNG Bike) लाँच करण्यात येणार आहे. ही सीएनजी बाईक बजाज कंपनी लाँच करणार आहे. याबाबतची नुकतीच घोषणा बजाज ऑटो लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी केली आहे. त्यामुळे ही बाईक पाहण्यासाठी तरुणांमधील उत्सुकता वाढली आहे.
सांगितले जात आहे की, बजाजच्या सीएनजी बाईकची रनिंग कॉस्ट पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकपेक्षा कमी असेल. तसेच ती पर्यावरणासाठी चांगली असेल. ही बाईक वेगवेगळ्या टप्प्यात लॉन्च करण्यात येणार आहे. या बाईकसाठी सीएनजी स्टेशन सर्वात प्रथम महाराष्ट्रात आणि त्यानंतर इतर राज्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील. वाढत्या महागाईच्या काळात ही बाईक एक सर्वसामान्य नागरिकांसाठी चांगला पर्याय ठरेल, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे.
सीएनजी बाईकची वैशिष्ट्य (CNG Bike)
खास म्हणजे, सीएनजीवर चालणाऱ्या बाइक्स पेट्रोल मोटारसायकलपेक्षा जास्त मायलेज देईल. ज्यामुळे इंधनाचा खर्च कमी होऊ शकतो. तसेच, सीएनजी बाईक पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकपेक्षा कमी आवाज निर्माण करणारी असेल. या बाईकमुळे प्रदूषणही कमी होईल. तसेच या बाईकसाठी कमी असतील त्यामुळे त्या सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील. सीएनजी बाईक आल्यानंतर वापरकर्त्यांना पेट्रोल डिझेलसाठी पैसे खर्च करावे लागणार नाही.
बाईकची किंमत
बजाज कंपनी या बाईकचे नाव ब्रुझर 125 सीएनजी असे ठेवण्याचा विचार करत आहे. सर्वात प्रथम ही बाईक महाराष्ट्रात लॉन्च होणार आहे. सुरुवातीला ही बाईक 1 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध असेल. या बाईकमध्ये 100CC, 125CC आणि 150CC बाईकचा समावेश असेल. सीएनजी बाईकमध्ये सुमारे 100-125 सीसीचे इंजिन असल्याची शक्यता आहे. सुरक्षितता लक्षात घेऊन या बाईकमध्ये सिंगल-चॅनल एबीएस किंवा कॉम्बी-ब्रेकिंग असेल. या बाईकमध्ये ड्युअल फ्युएल सिस्टीम पाहायला मिळेल.