शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी! आता रोजचा बाजारभाव मोबाईलवर समजणार; ‘हे’ काम आजच करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांना तुम्ही शेतात जे काही पिकवता त्याचा चालू बाजारभाव तुम्ही रोज पाहता काय? तुम्हाला कदाचित तुमच्या जवळच्या बाजारसमितीमधील बाजारभाव WhatsApp वर वगैरे मिळत असेलही पण हॅलो कृषी (Hello Krushi Mobile App) वर तुम्ही स्वत: महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील बाजारभाव जाणुन घेऊ शकता. अनेकदा बातम्यांमधून बाजारभाव दुसऱ्या दिवशी आपल्यापर्यंत पोहोचतो. पण हॅलो कृषीवर तुम्ही स्वत: हव्या त्या बाजारसमितीमधील त्या त्या दिवशीचा बाजारभाव चेक करु शकता. हॅलो कृषीवर मिनिटा मिनिटाला बाजारभाव अपडेट होतो. आता हे बाजारभाव तुमच्या मोबाईलवर कसे चेक करू शकता हे पाहूया… त्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. चला जाणून घेऊया…

१) सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करुन ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा.
Link : https://bit.ly/HelloKrushiApp

२) ऍप Install केल्यानंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक आवश्यक माहिती भरा.

३) त्यानंतर ‘हॅलो कृषी’ च्या होम पेजवर ‘उपलब्ध सेवा’ या अंतर्गत विविध विभाग दिसतील.

४)त्यापैकी ‘बाजारभाव’ हा विभाग निवडा.

५)त्यानंतर तुम्हाला एक वेब पेज ओपन झालेले दिसेल.

६) त्यानंतर ‘शेतमाल निवडा’ या शब्दावर क्लीक करा.

७)त्यानंतर तुम्हाला ज्या शेतमालाचे बाजारभाव हवे आहेत तो शेतमाल निवडा. (सोयाबीन )

८) त्यानंतर राज्यभरातील बाजारसमित्यांमध्ये निवडलेल्या शेतमालाला किती भाव मिळाला याची माहिती उपलब्ध होईल.

अशाप्रकारे तुमच्या मोबाईलवरच अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही शेतमालाचे ताजे बाजारभाव घरबसल्या मिळवू शकता.