बैलगाडा शर्यतीत ‘बकासूर’ ठरला जिवंत बोकड अन् 66 हजारांचा मानकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र बैलगाडा शर्तीचे जंगी आयोजन केले जात आहे. बैलगाडा शर्तीत प्रथम येणाऱ्या बैलजोडीला अनेक बक्षिस दिली जात आहेत. अशाच बैलगाडा शर्यतींचे आयोजन कराड तालुक्यातील तांबवे गावात करण्यात आले होते. या बैलगाडा शर्तीमध्ये बकासुर आणि सुंदर बैल जोडीने पहिला क्रमांक मिळवला. यावेळी त्यांना जिवंत बोकड आणि 66 हजार 666 रूपयांची रोख रक्कमेचे बक्षीस देण्यात आले.

तांबवे येथील श्री तांबजाई देवी व महादेव देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित ओपन बैलगाडा मैदानात पुणे- कात्रज येथील मोहील शेख- धुमाळ आणि वैभव साळुंखे- सुतगाव यांचा बकासुर व हाॅटेल निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या महागंडे यांच्या हिंदकेसरी सुंदर यांनी पहिला क्रमांक पटकावला. जीवन ड्रायव्हर निनाम (जि. सातारा) यांचा हिंदकेसरी पक्ष्या आणि नरसिंगपूर (जि. सांगली) यांच्या अंजीर या बैलजोडीने दुसऱ्या क्रमांकाचे 55 हजार 555 रूपये बक्षीस पटकावले.

शेती करताना त्याला जोडव्यवसाय म्हणून आपल्याला पशुपालन, शेळीपालन व्यवसाय करता येऊ शकतो. पशुपालनातून दुग्ध व्यवसाय करून त्यातून पैसे मिळवता येतात. तर शेळी पालनातूनही आर्थिक उत्पन्न मिळवता येते. अनेकदा चांगले दूध देणाऱ्या गाई, म्हशीं व इतर शेळींची खरेदी करताना आपल्याला सदर विक्रेत्याकडे जाणे मुश्किल होते. मात्र आता थेट पशुपालक अथवा शेळी विक्रेत्याकडून शेळी अथवा पशूंची खरेदी करता येणार आहेत. गुगलप्ले स्टोअरवरील Hello Krushi हे अँप इन्स्टॉल करून तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता. यासोबत आपल्याला शेतीतील इतर व्यवसायासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या योजनांची माहिती आदी गोष्टीही Hello Krushi अँपवर पाहता येतात.

हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click here…

Gangaram Patil ADVT

गाैतम शहाजी काकडे (निंबूत- बारामती) यांचा वजीर आणि पाली बुद्रुक येथील सुंदर बैलाने तिसऱ्या क्रमांकाचे 44 हजार 444 रूपये, कराड तालुक्यातील सैदापूर येथील धनाजी शिंदे यांच्या वश्या आणि जब्या जोडीने चतुर्थ क्रमांकाचे 33 हजार 333 रूपये, महेश माने (चरेगांव) यांचा स्वामी आणि वासरू बैल जोडीने पाचव्या क्रमांकाचे 22 हजार 222 रूपये तर रेठरे येथील पै. आनंदराव मोहिते यांच्या पाखऱ्या आणि म्हल्हार बैलजोडीने 11 हजार 111 रूपयांचे सहावे बक्षीस पटकावले. शर्यतीसाठी 125 हून बैलगाड्यांनी सहभाग घेतला.

यावेळी सर्व विजेत्यांना जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील, तात्यासो पाटील, महादेव पाटील, प्रशांत पाटील, सचिन पवार, जावेद मुल्ला, दिलीप पाटील, सुरज पाटील, विक्रम पाटील, चेतन शिंदे, नितीन पवार, नितीन फल्ले, हर्षल पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम, ढाल, सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देवून गौरविण्यात आले.