हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तिरुपती बालाजीच्या प्रसादात (Balaji Prasad Controversy) प्राण्यांची चरबी आणि माशाचं तेल वापरल्याचा आरोप मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपी सरकारच्या काळात हे सगळ सुरु होत असं चंद्राबाबूंनी म्हंटल. त्यानंतर टीडीपीच्या नेत्यांनी गुजरातच्या पशुधन प्रयोगशाळेने सादर केलेला रिपोर्ट सुद्धा दाखवला. आता तर तिरुमला तिरुपती मंदिराचे माजी मुख्य पुजारी रमण दीक्षाथालू यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. बालाजीच्या प्रसादाच्या लाडू मध्ये भेसळ होत आहे अशी शंका मला आधीपासूनच होती, मी त्याबद्दल तक्रारही केली होती, पण कोणीही लक्ष दिले नाही. असं रमण दीक्षाथालू यांनी सांगितलं.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रमण दीक्षाथालू म्हणाले, काही वर्षांपूर्वी मला हे लाडू बनवताना तुपात भेसळ झाल्याचे लक्षात आले होते. याबाबत मी संबंधित अधिकारी आणि देवस्थानच्या प्रमुखांकडे तक्रारही केली होती, पण कोणीही माझ्या तक्रारींकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर सत्तेवर आलेल्या नवीन सरकारने या सर्व गोष्टी दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते झाले नाही. ते सरकारी डेअरींमधून तूप विकत घ्यायचे आणि त्याच तुपापासून ते तयार करायचे. गेल्या ५ वर्षांपासून तिरुपती लाडूमध्ये (Balaji Prasad Controversy) प्राण्यांची चरबी आणि माशाचे तेल मिसळण्याचे घोर पाप करत आहेत. आता हे महापाप पुन्हा होऊ नये हे ठरवावे लागेल.
रिपोर्टमध्ये काय म्हंटलयं? Balaji Prasad Controversy
टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत गुजरातच्या पशुधन प्रयोगशाळेचा रिपोर्ट सर्वांसमोर सादर केला. या रिपोर्टमध्ये तुपाच्या नमुन्यात “बीफ फॅट” असल्याची पुष्टी झाली आहे. कथित प्रयोगशाळेच्या अहवालात नमुन्यांमध्ये “लार्ड” (डुकराच्या चरबीशी संबंधित) आणि फिश ऑइलचाही दावा करण्यात आला आहे. नमुने स्वीकारण्याची तारीख ९ जुलै २०२४ होती आणि प्रयोगशाळेचा अहवाल 16 जुलै चा होता. वेंकट रमण रेड्डी यांनी या रिपोर्टची प्रतही शार केली आहे. या एकूण सर्व प्रकरणामुळे संपूर्ण देशातील वातावरण गरम झालं आहे.
दरम्यान, मध्यंतरी अमूल कंपनीचे नाव पण या प्रकरणात घेतलं जात होते. परंत्तू कंपनीने लागलीच एक परिपत्रक काढून याबाबत स्पष्टीकरण दिले. तिरुमला तिरुपती देवस्थानम (Tirupati Balaji) ला अमूल तूप पुरवले जात असल्याचा उल्लेख करणाऱ्या काही सोशल मीडिया पोस्टच्या संदर्भात येतआहे. आम्ही हे कळवू इच्छितो की आम्ही कधीही TTD ला अमूल तूप पुरवठा केला नाही. आम्ही हे देखील स्पष्ट करू इच्छितो की अमूल तूप आमच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधांमध्ये दुधापासून बनवले जाते जे ISO प्रमाणित आहेत. अमूल तूप हे उच्च दर्जाच्या शुद्ध दुधाच्या फॅटपासून बनवले जाते. आमच्या डेअरीमध्ये मिळणारे दूध FSSAI द्वारे निर्दिष्ट केल्यानुसार भेसळ शोधण्यासह कडक गुणवत्ता तपासणीतून जाते.