हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । पुलवामा येथे सीआरपीफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्लानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देत एअर स्ट्राइक करत बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता. दरम्यान, हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा बालाकोट तळ पुन्हा एकदा सक्रीय झाला असून भारतावर हल्ला करण्यासाठी २७ दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मसूद अझहरचा मुलगा युसूफ अझहर सध्या जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या असून भारतावर हल्ला करण्यासाठी २७ दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या या दशतवाद्यांपैकी दहशतवादी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील आहेत. त्यांना पंजाब, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण देत आहेत. आपलं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रशिक्षण या आठवड्यात पूर्ण होईल. यानंतर दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतील.
भारताने एअर स्ट्राइक केल्यांनतर बालाकोटमधील दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता अशी माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली होती. भारताने जेव्हा एअर स्ट्राइक केला तेव्हा बालाकोटमध्ये ३०० दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. मात्र गुप्ततर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाकोट तळ पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्यासाठी सक्रीय झाला आहे. या माहितीनंतर आता भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.