व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर बाळासाहेब पाटलांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत आज पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी खासदार शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी एक मागणी केली आहे. पवार साहेबांनी यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी करत असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक मुंबईत घेतली जाणार आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब पाटील रवाना झाले. यावेळी त्यांनी कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले की, शरद पवार साहेबांचे पद हे राज्याच्या, देशाच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च आणि महत्वाचं असं पद आहे. आपण पाहिले असेल कि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न हे समजून घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका हि आदरणीय पवार साहेबांची राहिली आहे. त्यांनी आज जो काही निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे. त्यांनी आजच त्यांच्या निर्णयापासून परावृत्त व्हावं, अशी माझी आग्रहाची मागणी, विनंती आहे.

त्यांच्या मागणीनंतर अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात एक कमिटी आस्थापन करण्यात आली आहे. ती आज संध्याकाळी पवार साहेबांना भेटणार आहे. आणि त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहे. माझीही मागणी राहणार आहे कि आदरणीय पवार साहेबांनी निवृत्ती घेऊ नये, असे पाटील यांनी म्हटले.