Satara News : गुन्हेगारांचा वाढलेलं धाडस पुरोगामी महाराष्ट्रास अपेक्षित नाही : बाळासाहेब पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील गुरेघर येथील शिंद्रुकवाडीमध्ये गत महिन्यात रात्री पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. यामध्ये ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत याच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणी माजी सहकार मंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आज गुन्हेगारांच्या वाढलेलया धाडसामुळे पाटणसारखी घटना घडते. अशा प्रकारचे धाडस पुरोगामी महाराष्ट्रास अपेक्षित नाही,” असे पाटील यांनी म्हंटलेआहे.

कराड तालुक्यातील खराडे येथे माजी मंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी आ. पाटील यांनी पाटण तालुक्यात घडलेल्या खुनाच्या कुणाच्या घटनेचा उल्लेख करत प्रतिक्रिया दिली.

https://www.facebook.com/watch/?v=227115566472190&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=l2pjGR&ref=sharing

यावेळी आ. पाटील म्हणाले की, पाटण सारख्या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ठाण्याचा एक नगरसेवक पाटणमध्ये येतो त्या ठिकाणी जागा घेतो आणि त्या ठिकाणी काही वाद झाला तर सरळ खून करतो. हे कशामुळे होते. याला एकच कारण म्हणजे आज समाजात गुन्हेगारांचं धाडस वाढत चालल्याने होते. तसेच या पुरोगामी महाराष्ट्रात हे अपेक्षित नाही.