Wednesday, February 8, 2023

पालकमंत्र्यावर आ. बाळासाहेब पाटील यांचा पलटवार म्हणाले, सत्तेत कोण ते जनता ठरवेल

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पालकमंत्री म्हणून सगळ्या जिल्ह्याची जबाबदारी असते. सत्तेत कोण 5 वर्षे की 15 वर्षे राहील ही जनता ठरवेल, त्यामुळे कोणी सांगायची गरज नाही असे म्हणत आ. बाळासाहेब पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. राज्यात 15 वर्षे शिंदे- फडणवीस यांची सत्ता राज्यात राहणार असल्याचा वक्तव्यावर आ. पाटील यांनी उत्तर दिले.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. बाळासाहेब पाटील बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने उपस्थित होते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रामराजे नाईक- निंबाळकर यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी राष्ट्रवादी सत्तेविना राहू शकत नाही. तसेच पुढील 15 वर्षे शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत राहणार असल्याचे आ. देसाई यांनी म्हटले होते.

- Advertisement -

संवेदना नसलेले शिंदे- फडणवीस सरकार
शिंदे सरकारने दिलेला आनंदाचा शिधा दिवाळी संपत आली तरी लोकांपर्यंत पोचला नसल्याने माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. हे शासन संवेदना नसलेले शासन आहे. तुळशी विवाह पर्यंत दिवाळी आहे आणि तोपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचेल असं सांगितलं जात आहे. सरकारने दिलेला हा शिधा वेळेत पोहोचला नाही हे कबूल करण्याऐवजी तुळशी विवाह पर्यंत शिधा पोहोचेल असा आश्वासन सरकारकडून दिले जात आहे. मात्र दिवाळी संपेपर्यंत 100% शिधा लोकांपर्यंत पोहोचावा हीच अपेक्षा करतो असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी आ. पाटील यांनी लगावला..