आ. बाळासाहेब खिंड सोडून पळाले : राधाकृष्ण विखे- पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
मी ज्यावेळी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलो, त्यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी भीम गर्जना करत बाजीप्रभू देशपांडे यांच्याप्रमाणे खिंड एकटा लढवणार असल्याची सांगितले होते. मात्र, आता ते खिंड सोडून पळाले आहेत, अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे कराडमध्ये एका कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. यावेळी डाॅ. अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील आदी उपस्थित होते. तसेच अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पुन्हा एकदा साथ घातली.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/956791608579527

मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील म्हणाले, अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा भाजपमुळेच विजय झाला असल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले आहेत. त्यामुळे यातूनच सर्व काही स्पष्ट होते. आमदार सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे असे स्पष्ट करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा सत्यजित तांबे यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी साद घातली आहे. बाळासाहेब थोरात भाजपमध्ये आले तर त्यांना विरोध असयाचं कारणच नाही. पक्षनेतृत्वाने निर्णय करतात. उद्या तो निर्णय झाला, त्या निर्णयाला आम्हांला मान्य करावा लागेल.