मला सांभाळलंत, आता उद्धव आणि आदित्यला सांभाळा; बाळासाहेब शेवटच्या भाषणात काय म्हणाले होते?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेनेचा दसरा मेळावा.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी  30 ऑक्टोबर 1966 ला शिवाजी पार्कवरून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सुरुवात झाली. …  दसरा मेळाव्यानिमित्त बाळासाहेब ठाकरे दरवर्षी शिवाजी पार्कवरून विरोधकांवर आपल्या खास शैलीत टीका करत होते. तसेच शिवसेनेची आगामी वाटचाल स्पष्ट करत होते. मात्र 2012 ला बाळासाहेबांचे दसरा मेळाव्यातील भाषण अखेरचे ठरले. प्रकृती अस्वस्थेमुळे बाळासाहेबांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून हे भाषण शिवसैनिकांना ऐकवण्यात आले होते. यावेळी मला संभाळलेत, आता उद्धवला सांभाळा.. आदित्यला सांभाळा असं भावनिक आवाहन बाळासाहेबांनी केलं होत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत बाळासाहेबांचे हे वाक्य खूप महत्त्वाचे आहे.

बाळासाहेब ठाकरे आपल्या शेवटच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात खूपच थकलेले दिसले. तरीही यांनी भाषण करत शिवसैनिकांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला. जवळपास 45 वर्षे मी शिवसेनाप्रमुख म्हणून राहिलो. आता माझं वय 86 झालंय. मला झेपत नाही. आपण मला सांभाळलंत. मी तुम्हाला सांभाळलं. आता उद्धव – आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करा असं भावनिक आवाहन यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी केलं. त्याच्यामध्ये ईमान महत्त्वाचे आहे. हे ईमान सांभाळा. ते सांभाळाल तोपर्यंत शिवसेनेला कुणी हरवू शकणार नाही.

मी तुमच्यावर घराणेशाही लादली असेल तर विसरून जा. माझ्यामागून उद्धव-आदित्य हे तुमच्यावर लादले असतील तर विसरून जा. हे लादलेले नाहीत. तुम्हीच त्यांचा स्वीकार केलाय. हे सोनिया गांधींचं घराणं नाही. गांधी घराणं नाही . हे मी तुमच्यावर लादलेलं नाही. म्हणून मी सांगतो. मला सांभाळलंत, उद्धवला सांभाला. आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या… इमानाला महत्त्व द्या आम्हांला नाही असं आवाहन बाळासाहेबांनी या भाषणाच्या शेवटी केलं होतं.