मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कराड दौऱ्यापूर्वी ‘बळीराजा’ने दिला ‘हा’ थेट इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराडला दि. २४ ते २८ नोव्हेंबर कालावधीत १८ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन आयोजित केले जाते. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री दरवर्षी कराड स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वीच पश्चिम महाराष्ट्र ऊसदरावरून स्वाभिमानी, बळीराजा शेतकरी संघटनेने आंदोलन सुरु करत आक्रमक पावित्रा घेतला आहे. तर मुख्यमंत्री शिंदे कराड दौऱ्यास आल्यास त्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा दिला असल्याची माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी हॅलो महाराष्ट्र शी बोलताना दिली.

कराड येथे करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत अध्यक्ष पंजाबराव पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कराडला येणार असून त्यांच्याकडून समाधीस्थळी अभिवादन तसेच प्रदर्शनाचे उद्घाटन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, ते जेव्हा कराडला येतील तेव्हा त्यांना आमच्या वतीने काळे झेंडे दाखविण्यात येणार आहे.

https://www.facebook.com/watch/?v=1336915607184277

सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ऊसदर जाहीर करुन साखर कारखाने सुरु करावे असे साखर आयुक्त कार्यालयाने साखर कारखान्यांना कळवले आहे. मात्र, अपवाद वगळता कोणत्याही कारखान्याने ऊसदर जाहीर केलेला नाही. ही शेतकऱ्यांची लूट असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कराड येथील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी ऊसाचा दर जाहीर करावा आणि मगच कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी यावे.आम्हाला जर प्रशासनाकडून विरोध करण्यात आला तर संघटनेतर्फे काळे झेंडे दाखवून गनिमी काव्याने आंदोलन केले जाईल, असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला आहे.