Balochistan Firing : तुम्ही पंजाबचे आहात का? ओळख पटवल्यानंतर 23 प्रवाशांना गोळ्या; पाकिस्तानात काय घडलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पंजाबहून आलेल्या बसमधील प्रवाशांना खाली उतरवून त्यांना गोळ्या झाडण्यात (Balochistan Firing) आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुम्ही पंजाबचे आहात का? याची चौकशी आधी सदर हल्लेखोरांनी केली, आणि एकदा ओळख पटताच सर्व प्रवाशांवर गोळ्यांचा पाऊस पाडला. या घटनेत आतापर्यंत 23 लोक ठार झाल्याची माहिती आहे. पंजाब प्रांताच्या लोकांना टार्गेट करुन हा हल्ला करण्यात आला हे समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं? Balochistan Firing

याबाबत मुसाखेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त नजीब काकर यांनी माहिती देताना सांगितलं की, सशस्त्र हल्लेखोर राराशम परिसरातील इंटर स्टेट हायवेवर बस आणि ट्रक थांबवत त्यातील प्रवाशांची ओळख पटवण्यास सुरुवात केली. यानंतर जे प्रवाशी पंजाब प्रांतातील आहेत त्यांच्यावर खुलेआम गोळीबार करण्यात आला. हत्या करण्यात आलेल्या २३ जणांपैकी तिघेजण बलुचिस्तानचेच होते, तर उर्वरीत २० जण हे पंजाब प्रांतातून आले होते, अशीही माहिती त्यांनी दिली. या हल्लेखोरांनी फक्त नागरिकांवर गोळ्यांचं चालवल्या नाहीत तर 10 गाड्यांना आग सुद्धा लावली.

पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह रुग्णालयात नेण्यात येत आहेत. बलूचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या हत्याकांडाचा निषेध केला आहे. त्यांनी या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या. ४ महिन्यांपूर्वी सुद्धा असाच काही प्रकार घडला होता. त्यावेळी 9 प्रवाशांना गाडीतून खाली उतरवण्यात आलं होतं. आणि त्यांचं ओळखपत्र तपासून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या.

आजच्या या हल्ल्याची जबाबदारी (Balochistan Firing) बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं घेतली आहे. मात्र, आमच्या लोकांनी फक्त साध्या वेशात प्रवास करणाऱ्या लष्करी अधिकारी व सैनिकांना लक्ष्य केलं आहे, असं त्यांनी म्हंटल आहे. त्यांना गोळ्या घालण्याआधी त्यांची ओळख पटवण्यात आली होती, असंही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावला असून मृत्यू पावलेले लोक निरपराध नागरिक होते, असं ते म्हणाले आहेत