काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर । राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या प्रकृती चिंताजनक आहे. काल रात्रीपासून अचानक धानोरकर यांची प्रकृती बिघडली. त्यांनतर तातडीने एअरऍम्ब्युलन्सने त्यांना उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आले आहे.

कालच बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर त्यांना काळ रात्रीपासून अस्वस्थ वाटू लागले होते. यापूर्वी धानोरकर यांची किडनीस्टोन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच स्थूलतेची शस्त्रक्रियादेखील धानोरकर यांच्यावर झाली आहे. २ दिवसांपूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेत त्यांना स्वादुपिंडात इन्फेक्शन झाले. यांनतर त्यांना विशेष एअर ऍम्ब्युलन्सने दिल्लीला रवाना करण्यात आले.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून धानोरकर किडनीशी इतर आजारांनी त्रस्त होते. नागपूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र यावेळी त्यांना एक इन्फेक्शन झाले. आता धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.