Bambu Cultivation | बांबूची शेती करा आणि कमवा 2 लाखांपेक्षा अधिक नफा, वाचा सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bambu Cultivation | शेतकऱ्याला शेती करताना अनेक आव्हाने पेलावी लागतात. त्यात निसर्गाचे आव्हान खूप मोठे असते. कधी अवकाळी पाऊस पडतो, तर कधी गारपीट होते तर कधी अगदीच कोरडा दुष्काळ पडतो. या सगळ्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान होते. आणि शेतकरी आर्थिक दृष्ट्या हतबल होतो. निसर्गाची चक्र अशी फिरतात की शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास निघून जातो.

परंतु आता शेतकरी देखील वातावरणाच्या बदलानुसार वेगवेगळ्या प्रकारची शेती करण्याकडे वळत आहे. ती आज काळाची गरज आहे. शेतकरी पारंपरिक पद्धतीने पिके न घेता भाजीपाला, फळभाज्या या सोबतच सागवान, मोहमणी आणि बांबू सारख्या इतर झाडांची देखील लागवड करतात. कमी खर्चामध्ये ते जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात. आता आपण बांबू लागवड विषयी माहिती पाहणार आहोत. ज्याने कमीत कमी खर्चात शेतकऱ्यांना जास्त फायदा होईल.

बांबू लागवडीचा फायदा

शेतकरी बांबूला हिरवे सोने असे म्हणतात. कारण आज काल बांबूला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. आणि दिवसेंदिवस वाढतच आहे. आजकाल बांबूपासून अनेक गोष्टी बनवल्या जातात. फर्निचर बनवण्यासाठी देखील बनवण्यात देखील बांबूची उपयोग होतात. बांबूच्या कोंबापासून तयार करण्यात आलेले लोणचे तसेच कागद निर्मितीला देखील मोठ्या प्रमाणात आजकाल मागणी आहे. त्याचप्रमाणे बांबूचा वापर हा इथेनॉल तयार करण्यासाठी देखील होतात. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने बांबू हा अत्यंत फायद्याचा आहे.

कमी खर्चात होते बांबूची लागवड | Bambu Cultivation

बांबूच्या लागवडीचा खर्च हा खूप कमी आहे. शेतकरी बांधावर देखील या बांबूची लागवड करू शकतात. तुमच्याकडे जर कमी शेत असेल तरी देखील तुम्ही ही शेती करू शकता पाणथळ किंवा काळया जमिनीमध्ये देखील याची शेती करता येते. एका हेक्टरमध्ये पाच बाय चार मीटर अंतराने तुम्हालाही लागवड करावी लागते. साधारणपणे सहाशे बांबूंची यासाठी झाडे लागतात यामध्ये टिशू कल्चर रोपांचा वापर केला जातो. 25 रुपयांपर्यंत एक रोप तुम्हाला मिळते. त्याचप्रमाणे बांबूची लागवड करण्यासाठी सरकारकडून 50 ते 80% तुम्हाला अनुदान देखील दिले जाते त्यामुळे हा खर्च खूप कमी होतो.

सुरुवातीला तुम्हाला मशागत करणे, त्याचप्रमाणे मनुष्यबळ यासाठी खर्च येतो. परंतु नंतर 25 वर्षापर्यंत तुम्हाला लागवडीचा फक्त खर्च येतो. पुन्हा खर्च करण्याची गरज लागत नाही. त्याचप्रमाणे दोन वर्ष तुम्हाला पाण्याचे व्यवस्थापन करणे देखील गरजेचे असते बांबूच्या पिकाला इतर पिकांपेक्षा कमी पाणी लागते.

बांबूपासून आर्थिक उत्पन्न

बांबूची एकदा लागवड केली की, तीस वर्षापर्यंत तुम्हाला लागवड करावी लागत नाही. त्याचा पण तुम्हाला कोणताही खर्च येत नाही. लागवड केल्यानंतर तीन ते चार वर्षानंतर ते उत्पादन द्यायला सुरुवात करते. एका क्षेत्रामध्ये तुम्ही जर बांबू लावला तर तुम्हाला एक तरी सुरुवातीला 800 ते 900 बांबूचे उत्पादन निघू शकते. म्हणजे बाजारामध्ये 70 ते 100 रुपयापर्यंत तरी एक बांबू गेला तरी तुम्हाला वर्षाला 2 ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते