या फळाच्या फुलामुळे मधुमेह राहील कंट्रोलमध्ये; अशा पद्धतीने करा सेवन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशभरामध्ये मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चाललेली दिसत आहे. यामध्ये लहान मुलांसह तरुणांचा देखील समावेश होत चालला आहे. त्यामुळे या मधुमेहापासून (Diabetes) सुटका कशी मिळवावी असा प्रश्न अनेक लोकांना पडला आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की मधुमेह डॉक्टरांचे औषध उपचार न घेता देखील बरा केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला फक्त केळीच्या फुलाची आवश्यकता आहे. केळीच्या फुलामुळे तुमचा मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो. परंतु हे कसे शक्य आहे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

केळीच्या फुलातील पोषक तत्वे

केळीच्या फुलांमध्ये विविध अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि प्रथिने असतात. यांची खासियत म्हणजे त्यात कॅलरीज कमी असतात. यासोबतच पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, जस्त आणि तांबे ही महत्त्वाची खनिजे केळीच्या फुलांमध्ये आढळतात. त्यामुळे केळीचे फुल मधुमेह आजारावर रामबाण उपाय ठरते.

केळीच्या फुलांचे सेवन कसे करावे

केळीची फुलांची फ्लॉवर करी खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यात उच्च फायबर आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतात , जे रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात. यासह केळीच्या फुलामध्ये अनेक संयुगे असतात. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. यामध्ये ‘क्वेर्सेटिन’ आणि ‘केटचिन’ सारखे अँटीऑक्सिडंट असतात, जे उच्च कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतात.

हे पण एकदा करून पहा

मधुमेहाच्या आजारापासून सुटका मिळवायची असेल तर नायजेलाच्या बिया एकदा आहारात घेऊन पहा. या बियांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यासह प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे असेही गुणधर्म या बियांमध्ये असतात. त्यामुळे मधुमेहाच्या आजारावर या बिया रामबाण उपाय ठरतात.