Bandhan Bank च्या बचत खाते अन् FD वरील व्याजदरात वाढ !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bandhan Bank : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ होत असतानाच बँकेच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. याच दरम्यान आता खासगी क्षेत्रातील Bandhan Bank ने आपले बचत खाते आणि एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Bandhan Bank opens its first currency chest in Patna's Deedargunj |  Business Standard News

22 ऑगस्ट 2022 पासून नवीन दर लागू होणार

Bandhan Bank ने आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडी आणि बचत खात्यांच्या व्याजदरात वाढ केली ​​आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहिती नुसार 22 ऑगस्ट 2022 पासून हे नवीन दर लागू होतील. Bandhan Bank आता बचत खात्यांवर 6.25 टक्के तर एफडीवरील नियमित ग्राहकांसाठी 7.00 टक्के आणि ज्येष्ठांसाठी 7.50 टक्के व्याजदर देईल.

Bandhan Bank reports Q2 loss of ₹3,008 cr as provisions spike multi-fold |  Mint

Bandhan Bank च्या बचत खात्यावरील व्याज दर

Bandhan Bank कडून आता 1 लाख रुपयांपर्यंतच्या बचत खात्याच्या डेली बॅलन्सवर 3.00 टक्के तर 1 लाख आणि 10 लाख रुपयांपर्यंतच्या बचत खात्याच्या डेली बॅलन्सवर 6.00 टक्के व्याजदर देईल. तसेच बँक आता बचत खात्यातील 10 लाख ते 2 कोटी रुपयांच्या डेली बॅलन्सवर 6.25 टक्के व्याजदर देईल.

Independence Day Special FD Scheme Launched By SBI Bank Of Baroda And Axis  Bank With Higher Interest Rates | Independence Day Special FD Scheme: आजादी  के अमृत महोत्सव पर इन बैंकों ने

बंधन बँकेच्या एफडीवरील व्याज दर

Bandhan Bank आता 7 दिवस ते 30 दिवसांच्या FD वर 3% व्याजदर देतील. तसेच बँकेकडून 31 दिवसांपासून ते 2 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 3.5 टक्के व्याजदर दिला जाईल. त्याच बरोबर 2 महिने ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.50 टक्के व्याजदर दिला जाईल. बँकेच्या 1 वर्षापासून 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर आता 7 टक्के व्याजदर मिळेल. बंधन बँकेने 2 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 7 टक्के व्याजदर केला ​​आहे. बंधन बँकेने 5 ते 10 वर्ष कालावधीच्या FD वरील 5.60 टक्के व्याजदर आहे तोच ठेवला आहे.

Types of fixed deposit: How to Choose the Right FD | IDFC FIRST Bank

अनेक बँकांनी एफडीचे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच ICICI बँक, HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, करुड वैश्य बँक, इंडसइंड बँक, IDFC फर्स्ट बँक सारख्या बँकांनी देखील त्यांच्या एफडी वरील व्याज दरांमध्ये वाढ केली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर हे दर वाढवले गेले आहेत. हे लक्षात घ्या कि, अलीकडेच, RBI ने रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://bandhanbank.com/rates-charges

हे पण वाचा :

Bank FD : आता ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा !!!

LIC च्या ‘या’ योजनेमध्ये दररोज 29 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा लाखो रुपये !!!

Share Market : गेल्या आठवड्यात टॉप 10 पैकी पाच कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली घट !!!

3 महिन्यांसाठी YouTube Premium फ्री मध्ये मिळवण्याची संधी !!!

Aadhar Card मध्ये कोणती माहिती अपडेट करण्यासाठी किती खर्च येतो हे जाणून घ्या !!!