हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bank Deposit Insurance । समजा एखादी बँक फुटली आणि आर्थिक नुकसानीमुळे बँकेला टाळा लागला तर त्यातील ठेवीदारांना विमाच्या स्वरूपात जास्तीत जास्त ५ लाख रुपयांची रक्कम दिले जाते. परंतु ५ लाखांपेक्षा जास्त पैसे गुंतवले असतील तर उरलेल्या पैशाची गॅरेंटी नसते. यामध्ये अनेकांचे नुकसानही होते. लोकांना काळजी वाटते की त्यांच्या खात्यात जमा झालेल्या पैशांचे काय होईल? आता ही समस्यां काही प्रमाणात का होईना दूर करण्यासाठी रिझर्व्हबँक ऑफ इंडिया मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बँक डिपॉजिट विमा ५ लाख रुपयांवरून १० लाख रुपये करण्याची आरबीआयची तयारी सुरू आहे. बिझनेस स्टॅंडर्डने याबाबत वृत्त दिले आहे.
याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, सरकार पुढील ६ महिन्यांत या विम्याची (Bank Deposit Insurance) मर्यादा वाढवण्याचा विचार करत आहे. नव्याने वाढवण्यात येणारी पैशाची मर्यादा नेमकी किती असेल हे अजून निश्चित झालेले नाही. परंतु अधिकाऱ्याने स्पष्टपणे सूचित केले की ही मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत असेल. याचा अर्थ असा की भविष्यात कोणतीही बँक बुडाली तर तुम्हाला ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम सुरक्षितपणे मिळू शकेल. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. तसेच कोणत्याही चिंतेशिवाय ते बँकेत आपले पैसे डिपॉजिट करू शकतात.
बँक ठेव विमा म्हणजे काय? Bank Deposit Insurance
बँक ठेव विमा ही एक प्रकारची पैशाची गॅरेंटी असते . . समजा तुम्ही एखाद्या बँकेत पैसे गुंतवले आणि काही दिवसानंतर ती बँक बुडाली तरीही तुम्ही जमा केलेल्या पैशांची एक निश्चित रक्कम सुरक्षित राहते आणि बँक दिवाळखोरीत निघूनही तुमचे पैसे तुम्हाला मिळतात. यालाच बँक ठेव विमा म्हंटल जाते. सध्या या विम्याची मर्यादा ५ लाखांपर्यंत आहे. म्हणजेच काय तर बँक बंद झाली तर तुम्हाला जास्तीत जास्त ५ लाख रुपयेपर्यंत रक्कम परत मिळू शकते. आता हीच रक्कम १० लाख रुपये होण्याची शक्यता असल्याने मोठमोठ्या ठेवीदारांना लाभ होणार आहे.




