Bank FD : ‘या’ बँकेत FD वर मिळतोय भरगोस व्याज; गुंतवणूकदार होतील मालामाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bank FD) कधीही गुंतवणुकीचा विषय निघाला की सगळ्यात पहिला गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह पर्याय म्हणून बँकांच्या सुविधांकडे पाहिले जाते. यामध्ये विशेषतः एफडीला गुंतवणूकदारांची विशेष पसंती आहे. त्यामुळे बहुतेक बँका आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कायम विशेष एफडी योजना आणताना दिसतात. ज्यामध्ये आयडीबीआय (IDBI) बँकेचादेखील समावेश आहे. नुकतीच आयडीबीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक खास एफडी योजना आणली आहे. ज्यामध्ये कमी काळासाठी गुंतवणूक करून अधिक नफा मिळवता येणार आहे.

आयडीबीआय बँकेने गुंतवणूकदारांसाठी अगदी अल्प कालावधीतील लाभदायी उत्सव एफडी योजना आणली आहे. ही योजना आणि तिच्यातून मिळणार लाभ हा जाणून घेतल्यास गुंतवणूकदार नक्कीच आकर्षित होतील. (Bank FD) कारण आयडीबीआय बँक या उत्सव एफडी योजनेअंतर्गत एकूण ७.५५ टक्के इतके व्याज देत आहे. ही एफडी केवळ ३०० दिवसांची असणार आहे. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत ग्राहकांना ७.५५ टक्के व्याज मिळणार आहे. सध्या ३७५ आणि ४४४ दिवसांची उत्सव एफडी ही वार्षिक ७.८० टक्के आणि ७.७५ टक्के व्याज देत आहे. लक्षात घ्या, ही उत्सव कॉलेबल एफडी योजना येत्या ३१ मार्च २०२४ पर्यंत वैध आहे.

IDBI बँकेची उत्सव FD योजना (Bank FD)

आयडीबीआय बँक ही कायम आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना राबवत असते. यांमध्ये आता उत्सव एफडी योजनेचा देखील समावेश झाला आहे. ज्यात ३७५ दिवसांच्या उत्सव एफडीअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज दिले जात आहे. तर नियमित ग्राहक, एनआरआय (NRI) आणि एनआरओ (NRO) ग्राहकांना ३७५ दिवसांच्या उत्सव एफडीअंतर्गत ७.१० टक्के व्याज दिले जात आहे.

महत्वाचे म्हणजे, या एफडीमध्ये वेळेपूर्वी पैसे काढणे किंवा एफडी बंद करण्याचे पर्याय देखील उपलब्ध आहेत. (Bank FD) आयडीबीआय बँक ही ज्येष्ठ नागरिकांना ४४४ दिवसांसाठी या योजनेतील गुंतवणुकीवर ७.७५ व्याजदर देते आहे. तर एनआरआय आणि एनआरओ ग्राहकांना ७.२५ टक्के व्याजदर देते आहे. यानंतर आता आयडीबीआय बँक गुंतवणूकदारांना केवळ ३०० दिवसांची उत्सव एफडी योजना ऑफर करतेय. ज्यामध्ये ग्राहकांना ७.५५ टक्के व्याजदर दिला जात आहे.

नियमित FD वरील व्याजदर

आयडीबीआय बँकेच्या नियमित एफडीवर व्याजदर जाणून घेऊया. (Bank FD) त्यानुसार ७ ते ३० दिवसांच्या एफडीवर ३.०० टक्के व्याजदर दिला जातो. तर ३१ ते ४५ दिवसांच्या एफडीवर ३.२५ टक्के व्याजदर, ४६ ते ९० दिवसांसाठी ४.०० टक्के व्याजदर दिला जातो. तसेच ९१ ते ६ महिन्यांच्या एफडीवर ४.५० टक्के व्याजदर दिला जातो.

तर ६ महिने १ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ५.७५ टक्के व्याजदर दिला जातो. पुढे १ वर्ष ते २ वर्षे कालावधीसाठी (३७५ दिवस आणि ४४४ दिवस वगळता) ६.८० टक्के व्याजदर दिला जातो. याप्रमाणे २ वर्षे ते ५ वर्षे कालावधीसाठी ६.५० टक्के व्याजदर, ५ वर्षे ते १० वर्षे कालावधीसाठी ६.२५ टक्के व्याजदर, १० वर्षे ते २० वर्षे कालावधीसाठी ४.८० टक्के व्याजदर आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी ६.५० टक्के व्याजदर दिला जातो. (Bank FD)