हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ होत असतानाच खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका FD वरील व्याजदरात सातत्याने वाढ करत आहेत. याच दरम्यान आता करूर वैश्य बँकेने देखील आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.
हे लक्षात घ्या कि, ही वाढ 31 दिवस ते 6 वर्षांच्या एफडीवर करण्यात आली आहे. मात्र यापेक्षा कमी कालावधीच्या FD वर ग्राहकांना जुनाच व्याज दर मिळेल. 1 सप्टेंबरपासून हे नवीन व्याजदर लागू होणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. Bank FD
या मुदतीवरील व्याजदरात वाढ झाली आहे
बँकेकडून आता 31-45 दिवसांच्या एफडीवर 5.25 टक्के व्याज दिले जाईल. तसेच 46-90 दिवसांच्या एफडीवर 5.25 टक्के आणि 91 ते 120 दिवसांच्या एफडीवर 5.5 टक्के दर मिळेल. त्याचबरोबर 121 दिवस ते 180 दिवसांच्या एफडीवर 5.5 टक्के व्याज मिळेल. 181 ते 270 दिवसांच्या FD वर 5.75 टक्के, 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.90 टक्के, 1 ते 2 वर्षांच्या FD वर 6.10 टक्के व्याज आणि 2-3 वर्षांच्या FD वर, ग्राहकांना 6.10 टक्के व्याज दिले जाईल. त्याच वेळी 3 वर्षे ते 6 वर्षे किंवा त्याहून जास्त कालावधीच्या FD वरील व्याज 6.10 टक्के करण्यात आले आहे. Bank FD
ज्येष्ठ नागरिकांसाठीचा व्याज दर
आता बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 1 वर्ष ते 1 वर्षाच्या FD वर 6.50 टक्के व्याज मिळेल. तसेच 2-3 वर्षांच्या FD वर आता 6.50 टक्के आणि 3-5 वर्षांच्या FD वर 6.60 टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, 5 ते 10 वर्षांच्या FD वर 6.60 टक्के व्याज मिळणार आहे. Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.kvb.co.in/personal/deposits/fixed-deposits/
हे पण वाचा :
Wipro : ‘या’ IT कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिले करोडो रुपये !!!
आता SBI मध्ये कुठेही अन् कधीही उघडता येणार खाते !!! कसे ते जाणून घ्या
Chinese Loan App प्रकरणी ED कडून पेटीएम, रेझरपेच्या कार्यालयांवर छापे
SBI देत आहे अल्पवयीन मुलांसाठी खाते उघडण्याची सुविधा, त्याचे फायदे काय आहेत ते पहा