हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bank Holidays In July 2025 । बँक हा आपल्या आयुष्यातील कधीही न वगळला जाणारा विषय आहे. आजकाल मोबाईल वरून बँकेची कितीही कामे ऑनलाईन होत असली तरी बँकेत कोणत्या ना कोणत्या कारणाने जावं लागतच. कर्ज काढायचं असेल, मोठी रक्कम जमा करायची असेल किंवा चेकबुक संदर्भात काही काम असेल तर बँकेत जाणे गरजेचं बनतं. तुमचीही येत्या काही दिवसात बँकेत काही कामे असतील तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे, कारण जुलै महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी असेल? कोणकोणत्या तारखेला बँका बंद राहतील याबाबतची सविस्तर माहिती आम्ही सांगणार आहोत.
तर रिजर्व बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या यादीनुसार, जुलै महिन्यात तब्बल १३ दिवस बँका बंद (Bank Holidays In July 2025) राहणार आहेत. यामध्ये सणवार, विशेष दिन आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. मात्र या 13 सुट्ट्या सर्वच राज्यांमध्ये सरसकट लागू नसून अनेक सुट्ट्या प्रादेशिक आहेत. म्हणजेच या 13 सुट्यांमध्येही राज्यनिहाय सुट्यांची संख्या कमी जास्त होणार आहे. अशावेळी कोणत्या दिवशी बँका बंद आहेत हे माहिती करूनच बँकेत जावा अन्यथा तुमचा वेळ फुकट वाया जाऊ शकतो.
कोणकोणत्या तारखेला बँका बंद- Bank Holidays In July 2025
३ जुलै २०२५: खारची पूजा असल्याने या दिवशी आगरतळामध्ये बँका बंद राहतील.
५ जुलै २०२५: गुरु हरगोबिंद जी यांच्या जयंतीनिमित्त जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद राहतील.
६ जुलै २०२५: रविवारअसल्याने बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल.
१२ जुलै २०२५: दुसऱ्या शनिवारमुळे बँका बंद राहतील.
१३ जुलै २०२५: रविवार असल्याने या दिवशी बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल.
१४ जुलै २०२५: बेह दिनखलाममुळे शिलाँग झोनमध्ये बँका बंद राहतील.
१६ जुलै २०२५: हरेला सणामुळे डेहराडून झोनमध्ये बँका बंद राहतील. (Bank Holidays In July 2025)
१७ जुलै २०२५: यु तिरोट सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
१९ जुलै २०२५: केर पूजामुळे आगरतळा झोनमध्ये बँका बंद राहतील.
२० जुलै २०२५: रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे.
२६ जुलै २०२५: चौथ्या शनिवारमुळे देशातील सर्व बँका बंद राहतील.
२७ जुलै २०२५: रविवारअसल्याने बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल.
२८ जुलै २०२५: द्रुकपा त्से-जीमुळे गंगटोक झोनमध्ये बँका बंद राहतील.
सुट्ट्यांच्या कालावधीत बँक शाखा बंद राहिल्यामुळे चेक क्लिअरन्स, RTGS आणि NEFT सारख्या सेवांना विलंब होऊ शकतो. परंतु , ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैसे काढणे किंवा बिल पेमेंटसारखे व्यवहार शक्य होतील.




