हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bank Holidays In June । मे महिना संपत आला असून अवघ्या ३ दिवसांत जून महिना सुरु आहे. जून महिन्यात तुमची बँकेची काही कामे असतील तर कोणत्या दिवशी बँका सुरु आहेत आणि कधी सुट्टी आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे, नाहीतर तुमचा फुकटचा हेलपाटा होऊ शकतो. दरवेळी प्रमाणे यंदाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जून महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, जून महिन्यात एकूण १३ दिवस देशभरातील बँका बंद राहतील. कोणकोणत्या दिवशी बँकांना सुट्टी राहील आणि त्या सुट्टीमागील कारणे काय असतील हे सुद्धा आपण जाणून घेऊयात.
इथे पहा संपूर्ण यादी- Bank Holidays In June
१ जून २०२५ रोजी रविवार असून यादिवशी देशातील सर्वच बँकांना साप्ताहिक सुट्टी असते.
६ जून २०२५ रोजी शुक्रवारी ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद आहे आणि यानिमित्त तिरुवनंतपुरम आणि कोचीमध्ये बँका बंद आहेत.
७ जून, शनिवारी, बकरी ईद-उल-जुहानिमित्त देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. आगरतळा, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, आंध्र प्रदेश, भोपाळ, हैदराबाद, भुवनेश्वर, तेलंगणा, पणजी, पटना, रायपूर, इम्फाळ, चंदीगड, जयपूर, चेन्नई, जम्मू, हैदराबाद, कानपूर, कोहिमा, कोलकाता, लखनऊ, देहरादून, मुंबई, नागपूर, गुवाहाटी, नवी दिल्ली, शिमला, श्रीनगर, रांची आणि शिलाँग येथील बँकांना सुट्टी असेल.
८ जून रोजी रविवार असल्याने सर्व बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
१० जून रोजी श्री गुरु अर्जुन देव जी यांच्या शहीद दिनानिमित्त पंजाबमध्ये बँका बंद राहतील. Bank Holidays In June
११ जून रोजी संत गुरु कबीर जयंतीनिमित्त गंगटोक आणि शिमलामध्ये बँका बंद राहतील.
१४ जून ला महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.
१५ जून ला रविवार असल्याने सर्व बँकाना साप्ताहिक सुट्टी राहील.
यानंतर २२ जून ला रविवार असून साप्ताहिक सुट्टीमुळे देशातील सर्व बँका बंद राहतील.
२७ जून रोजी रथयात्रा/कांग रथयात्रेनिमित्त इम्फाळ आणि भुवनेश्वरमध्ये बँका बंद राहतील.
२८ जून रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहतील.
२९ जून ला रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल.
३० जून रोजी ऐझवालमध्ये बँका बंद राहतील.




