हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सप्टेंबर महिना संपत आला असून लवकरच ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात अनेक आर्थिक नियम बदलन्यात येणार आहेत. तसेच या महिन्यात सुद्धा बँकांना सुट्ट्या राहणार आहेत. ऑक्टोबर मध्ये अनेक सण आणि शनिवार रविवार पकडून तब्बल 15 दिवस बँका बंद राहतील. रिजर्व बँक ऑफ इंडिया ने याबाबत आदेश जारी करत माहिती दिली आहे.
आजकाल अनेक व्यवहार बँकांच्या (Bank) स्वरूपातच चालतात. या महिन्यात बँकांना सुट्ट्या असल्यामुळे बऱ्याच लोकांच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे . १५ दिवसांच्या सुट्ट्यामध्ये आठवड्यातील प्रत्येक रविवार , दुसरा आणि चौथा शनिवार तसचे अनेक सणांचा समावेश असणार आहे . त्यामध्ये गांधी जयंती , दुर्गापूजा , विजयादशमी , दिवाळी अशा सणांमुळे सुट्यांचा जणू वर्षावच पडणार आहे . त्यामुळे बँकेत तुमची काही कामे असतील तर सुट्ट्यांची यादी बघूनच बँकेत जावा.
कोणत्या तारखांना बँका बंद ? |Bank Holiday
१ ऑक्टोबर -जम्मू-कश्मीरमधील आगामी काळात विधानसभेच्या निवडणूकीमुळे १ ऑक्टोबर रोजी बँकांना सुट्या असणार आहेत .
२ ऑक्टोबर – गांधी जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये बँकांना तसेच अनेक सरकारी कामे बंद असणार आहेत.
३ ऑक्टोबर – जयपूरमध्ये नवरात्री आणि महाराजा अग्रसेन जयंती यामुळे काही बँकांना सुट्ट्या राहतील .
६ ऑक्टोबर – या दिवशी रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील .
१० ऑक्टोबर – आगरतळा, गुवाहाटी, कोहिमा, कोलकाता येथे महा सप्तमीच्या सणामुळे बँकांना सुट्टी दिली आहे .
१२ ऑक्टोबर – अनेक राज्यामध्ये महानवमीमुळे बँका बंद राहतील . याच दिवशी दुसरा शनिवास आहे .
१३ ऑक्टोबर – रविवार असल्यामुळे खाजगी तसेच सरकारी बँका बंद राहतील.
१४ ऑक्टोबर – दसऱ्यामुळे बँकांना सुट्टी राहील .
१६ ऑक्टोबर – यादिवशी लक्ष्मी पूजन आहे .
१७ ऑक्टोबर – महर्षी वाल्मिकी जयंती हि शिमला, बंगलोर, गुवाहाटी येथे असल्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे .
२० ऑक्टोबर – आठवड्याचा रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील .
२६ ऑक्टोबर – ऑक्टोबर २६ हा जम्मू आणि काश्मीरच्या इतिहासातील निर्णायक दिवस ठरला, कारण या दिवसामुळे जम्मू आणि काश्मीर भारताचा
अविभाज्य भाग बनला. विलीनीकरणाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. महिन्याच्या २६ तारखेला बँकेचा चौथा शनिवार आहे .
२७ ऑक्टोबर – रविवार असल्यामुळे सुट्टी राहील .
३१ ऑक्टोबर – सरदार वल्लभभाई पटेल जयंती तसेच दिवाळीच्या सणामुळे बँक बंद राहतील.