Bank Loan | अनेकवेळा आपल्याला तातडीने पैशांची गरज लागते. आणि अशा वेळेस नेमके काय करावे समजत नाही. बँकेत जरी पर्सनल लोन घ्यायला गेलो, तरी त्यासाठी खूप मोठी प्रक्रिया असते. त्यामुळे अशावेळी नक्की पैसे कुठून घ्यायचे हा प्रश्न पडत असतो. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका बँकेबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्हाला दहा मिनिटात दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल. एचडीएफसी बँकेने ही एक खास सुविधा केलेली आहे. आता या सुविधाचा लाभ कसा घ्यायचा? हे आपण जाणून घेणार आहोत.
एचडीएफसी बँकेच्या (Bank Loan) या कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाते. आणि सगळी कागदपत्र बरोबर आहेत का? याची पडताळणी केली जाते. आणि त्यानंतर तुमचे कर्जाचे पैसे तुमच्या बँक खातात पाठवले जातात.
एचडीएफसी बँक ही पर्सनल लोन देते. परंतु हे पर्सनल लोन घेण्यापूर्वी तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की, त्यांच्या वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात सतत चढ-उतार करत असते. ही बँक सध्या 10 टक्के ते 14 टक्के पर्यंत व्याजदर आकारते. एचडीएफसी बँकेद्वारे तुम्हाला 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. ही एक सर्वात जलद लोन देणारी बँक आहे.
अर्ज कसा करायचा ? | Bank Loan
- एचडीएफसी बँकेकडून पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये एचडीएफसी बँकेचे ॲप डाऊनलोड करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला Apply Now या बटणावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर कर्जाच्या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल.
- त्यानंतर या अर्जातील सर्व माहिती अचूक भरलेली असणे गरजेचे आहे.
- माहिती भरल्यानंतर केवायसी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल.
- या कर्जाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जर पात्र असाल, तर कर्जाची रक्कम काही वेळातच तुमच्या बँक खात्यावर पाठवली जाते.