हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Loan Recovery : आपल्या दररोजच्या आयुष्यात आणीबाणीच्या प्रसंगी आपल्याला पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत लोकं बँकेकडून कर्ज घेतात. ज्यावर त्यांना व्याजही द्यावे लागते. मात्र, काही वेळा बँकांकडून घेतलेले कर्ज लोकांना परत करता येत नाही. अशा स्थितीत अनेकदा कर्जासाठी सिक्योरिटी म्हणून ठेवलेली मालमत्ताही गमवावी लागते. कारण अशा परिस्थितीत कर्जासाठी गहाण ठेवलेली मालमत्ता जप्त करण्याचा कायदेशीर अधिकार बँकेला आहे.
जर आपणही बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि आपल्याला त्याची परतफेड (Loan Recovery) करता येत नसेल तर याबाबत आपल्याला असलेल्या हक्कांची माहिती आपल्याला असायला हवी. कारण जर कधी अशी परिस्थिती उदभवली तर आपल्याकडे असलेले अधिकार आपण वापरू श मग त्याविषयीयी ची माहिती जाणून घेऊयात…
कर्ज वसुली एजंट धमकावू शकत नाहीत
जर एखादा ग्राहकाने बँकेकडून कर्ज घेतेलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केली नाही तर बँक ते पैसे रिकव्हरी एजंटमार्फत पैसे वसूल करते. अशावेळी अनेकदा वसुली एजंट ग्राहकांना धमकावून कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न करतात. मात्र इथे हे लक्षात घ्या की, त्यांना ग्राहकांना धमकावण्याचा किंवा गैरवर्तन करण्याचा अधिकार नाही. तसेच कर्जाच्या वसुलीसाठी, बँकेचे अधिकारी किंवा रिकव्हरी एजंट डिफॉल्टरला सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेतच कॉल करू शकतात. तसेच, कर्जाच्या संदर्भात डिफॉल्टरच्या घरी जाण्याची वेळही तीच आहे. तसेच जर वसुली एजंट ग्राहकांशी गैरवर्तन करत असतील तर ते बँकेकडे याबाबत तक्रारही करू शकतात. काहीच तसेच जर बँकेकडूनही याबाबत सुनावणी झाली नाही तर बँकिंग लोकपालकडे अपील करता येईल. Loan Recovery
नोटीस दिल्याशिवाय मालमत्ता ताब्यात घेता येणर नाही
हे लक्षात घ्या कि, कर्जाची वसूली करण्यासाठी कोणत्याही बँकेला सूचना दिल्याशिवाय आपली मालमत्ता ताब्यात घेता येणार नाही. जर एखाद्या ग्राहकाने 90 दिवसांपर्यंत कर्जाचा हप्ता भरला नाही, तर ते खाते नॉन-परफॉर्मिंग एसेट (NPA) मध्ये टाकले जाईल. मात्र यासोबतच कर्ज घेणाऱ्या थकबाकीदाराला 60 दिवसांची नोटीसही द्यावी लागेल. तसेच या नोटीसच्या कालावधीतही जर त्याने कर्जाची परतफेड केली नाही, तर बँकेकडून त्याची मालमत्ता ताब्यात घेतली जाईल. तसेच मालमत्तेच्या लिलावाच्या 30 दिवस आधी ग्राहकाला सार्वजनिक नोटीस जारी करावी लागेल. Loan Recovery
मालमत्तेच्या लिलाव किंमतीला आव्हान देऊ शकते
कोणत्याही बँकेकडून आपल्या डिफॉल्ट ग्राहकांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यापूर्वी त्या मालमत्तेचे मूल्य सांगणारी नोटीस जारी केली जाते. ज्यामध्ये रिझर्व्ह प्राइस, लिलावाची तारीख आणि वेळ देखील देण्यात येते. अशा स्थितीत ग्राहकाला आपल्या वस्तूची किंमत कमी झाली आहे असे वाटल्यास त्याला या लिलावास आव्हानही देता येते. तसेच, लिलावानंतरही, कर्जाची वसुली झाल्यानंतर उर्वरित रक्कम मिळविण्याचाही ग्राहकाला पूर्ण अधिकार आहे.Loan Recovery
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/NotificationUser.aspx?Id=4141&Mode=0
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन भाव पहा
Honda SP125 ही बाईक भारतात 2 व्हेरिएंटमध्ये लॉन्च, पहा किंमत अन् फीचर्स
Cibil Score : सिबिल स्कोअर फ्री मध्ये कसा चेक करायचा? जाणून घ्या कामाची गोष्ट
Business Idea : राखेपासून विटा बनवण्याच्या व्यवसायाद्वारे दरमहा मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
Investment Tips : डेट म्युच्युअल फंड की एफडी यांपैकी जास्त रिटर्न कुठे मिळेल ? तज्ज्ञांकडून समजून घ्या