Bank of Baroda च्या FD वरील व्याजदरात वाढ !!! नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : RBI कडून गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा रेपो दरात वाढ करण्यात आली. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली आहे. या दरम्यानच आता सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

BoB HIkes FD Rates On Domestic Term Deposits Check Out - BW Businessworld

नवीन दर 28 जुलै 2022 पासून लागू 

Bank of Baroda ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी व्याजदर वाढवले ​​आहेत. नवीन दर 28 जुलै 2022 पासून लागू झाले आहेत.

What Is A FD Interest Calculator & What Are The Benefits Of Using It? -  Inventiva

असे असतील व्याजदर

आता Bank of Baroda आता सर्वसामान्यांसाठी 3.00 टक्के ते 5.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के ते 6.50 टक्के व्याजदर देत ​​आहे. Bank of Baroda ने 7 ते 45 दिवसांच्या एफडीवरील व्याजदरात 2.80 टक्क्यांवरून 3.00 टक्के तर 46 ते 180 दिवसांच्या एफडीवरील व्याजदरात 3.70 टक्क्यांवरून 4.00 टक्के केला आहे. बँक ऑफ बडोदा आता 181 दिवसांपासून 270 दिवसांपर्यंतच्या डिपॉझिट्सवर 4.30 टक्क्यांऐवजी 4.65 टक्के व्याजदर देणार आहे. तसेच 271 दिवस आणि त्यापेक्षा जास्त आणि 1 वर्षापेक्षा कमीच्या डिपॉझिट्सवर बँक 4.65 टक्के दराने व्याज देईल.

Fixed Deposit (FD): If you are planning to get FD, then keep these 5 things  in mind including laddering and short term FD, it will benefit more -  Business League

अनेक बँकांनी एफडीचे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच एसबीआय, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक, आयडीबीआय बँक इत्यादींनी देखील आपल्या FD वरील दरांमध्ये वाढ केली आहे. RBI कडून रेपो दरात वाढ झाल्यानंतर बँकाकडून हे दर वाढवण्याची प्रक्रिया सुरू झाली. Bank of Baroda

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofbaroda.in/interest-rate-and-service-charges/deposits-interest-rates

हे पण वाचा :

भारतातील IT Industry मधील सर्वाधिक पगार घेणारे 5 सीईओ कोण आहेत ???

31 जुलैपर्यंत ITR भरा; अन्यथा होईल ‘इतका’ दंड

Renault Kiger 2022 : नवीन अपडेटसह लॉंच झालेली Renault Kiger बाजारात घालणार धुमाकूळ; पहा फीचर्स आणि किंमत

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज जोरदार उसळी !!! नवीन दर पहा

Asus ROG Phone 6 Pro : 18 GB RAM चा Asus चा दमदार मोबाईल लॉंच; पहा किंमत आणि सर्वकाही