हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीच्या बँकेमधील एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने (Bank Of Baroda) आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मान्सून धमाका ठेव योजना (BOB Monsoon Dhamaka Deposit Scheme) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या ठेवीवर जास्तीत जास्त व्याज देण्यात येईल. बँक ऑफ बडोदाने आपली ही मान्सून धमाका ठेव योजना २ कालावधी साठी आणली आहे. एक म्हणजे 333 दिवसांसाठी, त्याअंतर्गत ग्राहकांना ठेवीवर 7.15% व्याज दर ऑफर करण्यात येईल तर दुसरी आहे ती म्हणजे ३९९ दिवसांसाठी, त्याअंतर्गत ग्राहकांना 7.25% व्याज दर देण्यात येईल. जर तुम्ही जेष्ठ नागरिक असाल तर 0.50% अधिक व्याजदर देण्यात येईल. बँक ऑफ बडोदाची मान्सून धमाका ठेव योजना 3 कोटी रुपयांपेक्षा कमी किरकोळ ठेवींसाठी सुरु करण्यात आली आहे.
बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक श्री संजय मुदलियार यांनी म्हंटल की, “बँक ऑफ बडोदा मान्सून धमाका ठेव योजना सुरू केल्याची घोषणा करताना आनंद होत आहे, ज्या अंतर्गत ग्राहक त्यांच्या बचतीवर जास्तीत जास्त व्याजदर मिळवू शकतात. हे दोन कालावधींमधील निवड करण्याची संधी देखील ग्राहकांना करते. ग्राहकांना त्यांच्या ठेवींवर जास्त व्याजदर मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. मान्सून धमाका ठेव योजना ऑनलाइन किंवा बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन उघडता येते.
दरम्यान, बँक ऑफ बडोदा ही भारतातील आघाडीची बँक आहे. भारत सरकारची कमाल मालकी हिस्सेदारी ६३.९७% आहे. जगभरात बँक ऑफ बडोदाचे जवळपास 165 कोटी ग्राहक असून एकूण 17 देशांमध्ये 70000 हून अधिक शाखांच्या माध्यमातून बँक आपल्या ग्राहकांना सेवा देत असते. यासोबतच,बँक तिच्या विविध डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे सर्व बँकिंग उत्पादनांच्या सुलभ आणि सोयीस्कर सेवा देखील प्रदान करत आहे. आपल्या विविध ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि त्यांच्या सर्व बँकिंग व्यवहारांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हे बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे.