Bank Of Baroda Recruitment 2025 : 10 वी उत्तीर्णांना बँकेत नोकरीची संधी; 503 पदांची भरती जाहीर, पगार किती?

Bank Of Baroda Recruitment 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Bank Of Baroda Recruitment 2025)। १० वी पास उमेदवारांना बँकेत नोकरी करण्याची मोठी सुवर्णसंधी आहे. देशातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल 503 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. शिपाई पदासाठी हि भरती असून पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठीची अर्जप्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीची आहे. 23 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी हि संधी सोडू नये. बँक ऑफ बडोदामधील या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांचे शिक्षण किती असावं? त्यांना पगार किती मिळेल? आणि निवड प्रक्रिया कशी असेल याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात.

तर बँक ऑफ बडोदामध्ये देशभरातून शिपाई पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यात एकूण 503 जागा भरल्या जाणार असून ,महाराष्ट्राच्या वाट्याला २९ जागा आल्यात. त्यासाठी सदर उमेदवाराचे शिक्षण किमान १० वी पर्यंत तरी असावे. तसेच सदर उमेदवाराला स्थानिक भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. जेणेकरून बँकेतील ग्राहकांशी व्यवस्थित सुसंवाद साधता येईल.

वय आणि पगार किती? Bank Of Baroda Recruitment 2025

वयाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, सदर उमेदवाराचे वय हे कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २६ वर्षे असावे. म्हणजेच काय तर ०१-०५-१९९९ च्या आत जन्मतारीख असलेले उमेदवार या नोकरीसाठी पात्र नाहीत. पगाराबाबत बोलायचं झाल्यास, बँक ऑफ बडोदामधील ऑफिस असिस्टंट म्हणजेच शिपाई यांचे वेतनमान दरमहा १९५००-३७८१५ रुपये असेल.

अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रिया-

बँक ऑफ बडोदामधील शिपाई पदाच्या भरतीसाठी (Bank Of Baroda Recruitment 2025) अर्ज शुल्क ६०० रुपये आहे. तर एससी/एसटी प्रवर्ग, अपंग आणि महिलांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. ऑनलाइन चाचणी आणि कागदपत्र पडताळणीनंतर उमेदवारांची निवड करण्यात येईल.

असा करा अर्ज?

सर्वात आधी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटला (bankofbaroda.in) भेट द्या.
त्यानंतर होमपेज वरील करिअर’ या ऑप्शन वर क्लिक करा.
आता Recruitment of Office Assistant (Peon) नोटिफिकेशन’ वर क्लिक करा.
तुमच्यासमोर PDF येईल ती वाचा.
परत मागच्या पेज वर जावा आणि Apply लिंकवर क्लिक करा.
येथे आवश्यक माहिती भरा आणि कॅप्चा टाका. (Bank Of Baroda Recruitment 2025)
खालील निळ्या बॉक्समधील ‘रजिस्टर पर्यायावर क्लिक करा. यामुळे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
नोंदणी दरम्यान, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर आणि ई-मेल आयडीवर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळेल.
आता मागील पानावर परत या. लॉगिन करण्यासाठी, ‘आधीच रजिस्टर असल्यास लॉगिन करा’ पर्यायावर क्लिक करा.
आता लॉग इन करा. अर्जाचा फॉर्म एका नवीन पानावर उघडेल. मागितलेली संपूर्ण माहिती त्यात भरा.
विनंती केलेल्या कागदपत्राची PDF फाइल अपलोड करा.
शेवटी कॅप्चा भरल्यानंतर अर्ज सबमिट करा. यामुळे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

इथे करा अर्ज – bankofbaroda.in