बँक ऑफ बडोदात या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; अर्जाविषयी सविस्तर माहिती वाचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या अनेक तरुण नोकरीच्या शोधामध्ये वणवण फिरताना दिसत आहेत. परंतु आता या तरुणांची नोकरी शोधण्याची शोधमोहीम इथेच थांबणार आहे. कारण की, बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) मुंबई येथे विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी तरुणांकडून अर्ज मागवले जात आहेत. त्यामुळे तुम्ही जर बँकेत काम करू इच्छित असाल आणि तुम्हाला या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर पुढे दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे. लक्षात ठेवा की हे अर्ज फक्त 23 मार्चपर्यंत स्वीकारले जातील.

कोणत्या पदासाठी भरती

बँक ऑफ बडोदामध्ये व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदांच्या 29 जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी उमेदवाराला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. हा अर्ज फक्त 23 मार्च 2024 पर्यंत स्वीकारला जाईल.

शैक्षणिक पात्रता काय हवी?

इच्छुक उमेदवारांकडे ज्या पदासाठी अर्ज करणार आहेत त्या पदासंबंधीत पदवी असणे आवश्यक आहे. या पदांसाठी कमीत कमी उमेदवाराकडे पदवी आणि संगणकाचे उत्तम ज्ञान असायला हवे.

वयोमर्यादा काय?

या पदासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 65 वर्ष इतकी आहे या वयापेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्तीने अर्ज केल्यास त्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

अर्ज पाठवायचा कोठे?

बँक ऑफ बड़ौदा, कोटा क्षेत्र प्रनम तल, पुखराज टाबर, स्टेशन रोड कोटा- 324002 या पत्त्यावर तुम्ही अर्ज पाठवू शकता परंतु हा अर्ज तुम्हाला 23 मार्चच्या आत पाठवावा लागणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत

  • या पदासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. या अर्जासह तुम्हाला आवश्यक असणारी कागदपत्रे ही जोडावी लागणार आहेत.
  • या अर्जामध्ये तुम्ही कोणतीही खोटी माहिती भरता कामा नये तसेच अर्धवट देखील माहिती भरू नये.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरतीची जाहिरात पाहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही www.bankofbaroda.in ला भेट देऊ शकता.