Bank Of India Recruitment 2024 | ‘बँक ऑफ इंडिया’मार्फत मेगा भरती, 143 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bank Of India Recruitment 2024 | आपल्या देशामध्ये अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत. आजकाल या बेरोजगारीची संख्या जास्तीत जास्त वाढत चाललेली आहे. तरुणांनी चांगले शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नाही. तर काही लोकांपर्यंत नोकरीच्या संधी पोहोचतच नाही. आम्ही आमच्या लेखांमधून नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरीच्या नवनवीन संधी पोहोचवत असतो. ज्याच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करून एक चांगली नोकरी मिळवता. अनेक लोकांना सरकारी नोकरी करण्याची खूप इच्छा असते.

आज आम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता बँक ऑफ इंडियामार्फत एक मोठी भरती होणार आहे. या भरतीची अधिसूचना देखील बँकेकडून जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीद्वारे बँक ऑफ इंडियामध्ये (Bank Of India Recruitment 2024) तब्बल 143 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी पात्र उमेदवाराकडून आता बँकेने ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. 27 मार्च 2024 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तर 10 एप्रिल 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा.

रिक्त जागा

बँक ऑफ इंडियाकडून 143 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

रिक्त पदाचे नाव | Bank Of India Recruitment 2024

  • क्रेडिट ऑफिसर – 25
  • चीफ मॅनेजर – 9
  • लॉ ऑफिसर – 56
  • डाटा सायंटिस्ट – 2
  • फुल स्टॅक डेव्हलपर – 2
  • डाटाबेस एडमिन – 2
  • डाटा क्वालिटी डेव्हलपर -2
  • डाटा गव्हर्नर एक्सपर्ट – 2
  • प्लॅटफॉर्म इंजीनियरिंग एक्सपर्ट – 2
  • ओरॅकल एक्साडेटा एडमिन -2
  • सीनियर मॅनेजर – 35
  • इकॉनोमिस्ट – 1
  • टेक्निकल ऍनालिस्ट – 1

वयोमर्यादा

1 फेब्रुवारी 2024 पर्यंत 45 वर्ष त्याचप्रमाणे एससी, एसटी कॅटेगिरीतील विद्यार्थ्यांना 5 वर्ष सूट दिली आहे. त्याचप्रमाणे ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 3 वर्ष दिलेली आहे.

अर्ज शुल्क

जनरल ,ओबीसी – 850 रुपये
एससी, एसटी पीडब्ल्यूडी – 175 रुपये

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख 27 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा