हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bank of Maharashtra । सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाची बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राने कर्जावरील व्याजदर कमी करत ग्राहकांना मोठं गिफ्ट दिले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने गृहकर्ज, कारलोन, शैक्षणिक कर्ज आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेटशी जोडलेल्या इतर कर्जांसह किरकोळ कर्जांवरील व्याजदर ५० बेसिस पॉइंट्सपर्यंत कमी केला आहे. हे नवीन व्याजदर १० जूनपासून लागू होतील. ६ जून रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट ५० बेसिस पॉइंट्सने कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केल्यानंतर Bank of Maharashtra ने सुद्धा आरबीआयच्या सूचनेनुसार आपल्या व्याजदरात कपात केली आहे.
आता किती टक्क्याने कर्ज मिळणार – Bank of Maharashtra
बँक ऑफ महाराष्ट्रने (Bank of Maharashtra) कर्जावरील व्याजदर ५० बेसिस पॉइंट्सपर्यंत कमी केल्यानंतर आता बँकेच्या गृहकर्जाची सुरुवात ७.३५ टक्के पासून होईल तर कार लोन ७.७ टक्क्यांपासून मिळेल. बँकिंग क्षेत्रात हे व्याजदर खूपच कमी मानले जातात. कमी व्याजदरांचा हा फायदा बँकेच्या सर्व ग्राहकांना सर्वोत्तम वित्तपुरवठा उपाय प्रदान करण्याची आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करण्याची वचनबद्धता दर्शवितो, असे बँकेकडून सांगण्यात आलं आहे. ग्राहकांमध्ये खुश करण्यासाठी आपण व्याजदरात कपात केली असल्याचा दावा बँक ऑफ महाराष्ट्राने केला आहे.
बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँकेनेही स्वस्त केली कर्जे –
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट मध्ये कपात केल्यानंतर बँक ऑफ इंडिया या देशातील आघाडीच्या राष्ट्रीय बँकेनेही आपल्या व्याजाचे दर कमी केले.याबाबत बँक ऑफ इंडियाने शेअर मार्केटला माहिती देत म्हंटल कि, रेपो आधारित लँडिंग दरांमध्ये बदल करत RBLR रेट ८.८५ टक्क्यांवरून ८.३५ टक्के करण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) सुद्धा त्यांच्या व्याजदरात कपात केली आहे. पीएनबीनेही रेपो लिंक्ड लँडिंग दर कमी करत ८.८५ टक्क्यांवरून ८.३५ टक्क्यांवर आणले आहेत. मात्र MCLR आणि बेस रेट मध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बँक ऑफ बडोदाने एक महिन्यापासून एक वर्षापर्यंतच्या विविध कालावधीसाठी त्यांच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.50 टक्क्यांनी कपात केली आहे. सर्वच बँकांची कर्जे स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे हे मात्र नक्की.




