हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bank Overdraft) देशातील नागरिकांना विविध सुविधा प्रदान करण्यासाठी सरकार कायम सक्रिय असते. त्यामुळे सरकार कायम वेगवेगळ्या योजना राबवित असते. ज्यामधून नागरिकांना अनेक प्रकारचे लाभ प्रदान केले जातात. अगदी असेच विविध फायदे बँकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या योजनांमधून देखील मिळत असतात. यातच आज आपण एका अशा योजनेची माहिती घेणार आहोत. जिच्या माध्यमातून लोकांना विशेष लाभ घेता येईल. ही योजना म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट.
अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत अचानक पैशांची गरज भासते. नेमक अशावेळी आपलं अकाउंट रिकामी असतं. ज्यामुळे आपल्या आर्थिकच नव्हे तर मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागते. त्यामुळे बँका पर्सनल लोन किंवा इतर कर्जाची उपलब्धता प्रदान करतात. संकटकाळात ग्राहक देखील या मार्गांचा अवलंब करतात आणि पैसा उभारतात. (Bank Overdraft) पण प्रत्येकवेळी लोन घेण्याची गरज नाही. कारण तुम्हाला पैशांची गरज असेल आणि अशावेळी तुमचं अकाउंट खाली असेल तर बँक तुम्हाला ओव्हरड्राफ्टचा पर्याय देते. ज्यामध्ये तुम्हाला खात्यात कोणतीही रक्कम शिल्लक नसताना बँकेतून पैसे काढता येतात. आता ओव्हरड्राफ्ट कसे काम करते? याविषयी जाणून घेऊया.
ओव्हरड्राफ्टची सुविधा कोणासाठी? (Bank Overdraft)
तुम्ही कोणत्याही बँकेत अकाउंट ओपन करा. पण त्याआधी ती बँक तुमचे बचत खाते उघडताना ओव्हरड्राफ्टची सुविधा देते का? याची खात्री नक्की करून घ्या. कारण प्रामुख्याने ज्या व्यक्तींनी जनधन योजनेअंतर्गत खाते उघडले असेल त्यांना बँक ओव्हरड्राफ्टची सुविधा प्रदान केली जाते.
ओव्हरड्राफ्टमधून किती रक्कम काढता येते?
ओव्हरड्राफ्ट हा एक कर्जाचा प्रकार आहे. मात्र यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. शिवाय तुम्हाला कोणताही फॉर्म, शिक्का याचीही गरज नाही. कारण ही सुविधा अगदी ताबडतोब उपलब्ध असते. (Bank Overdraft) ओव्हरड्राफ्टची सुविधा तुम्हाला किमान १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढून देते. या अंतर्गत तुम्ही तुमच्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढू शकता. मात्र यामध्ये तुम्हाला किती पैसे काढता येतील याबाबत बँकेने काही नियम ठरवलेले आहेत.
ओव्हरड्राफ्ट सुविधा आणि कर्ज यांमध्ये मोठा फरक
ओव्हरड्राफ्ट सुविधा आणि कर्ज यामध्ये बराच मोठा फरक आहे. सोपं करून सांगायचं तर, अगोदर कर्ज घेतले असेल तर त्यावर आकारलेल्या व्याजाची गणना ही मासिक आधारावर केलेली असेल. (Bank Overdraft) मात्र ओव्हरड्राफ्टमध्ये व्याजाची गणना ही प्रत्येक दिवसाला केली जाते. लक्षात घ्या, ओव्हरड्राफ्टची सुविधा वापरल्यास तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागते.
कोणाला मिळतो फायदा?
ओव्हरड्राफ्ट सुविधेचा वापर करण्यासाठी तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असणे गरजेचे आहे. ओव्हरड्राफ्ट ही सुविधा जनधन खातेधारकांना देखील दिली जाते. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ६५ वर्षादरम्यान असावे लागते.
याशिवाय तुमच्या बचत खात्यात कमीत कमी ६ महिने नीट ट्रांजेक्शन झाले असेल तर आणि फक्त तेव्हाच तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट दिला जाऊ शकतो. म्हणजेच ज्यांच्या बँक अकाऊंटमध्ये व्यवस्थित ट्रांजेक्शन झालेले असतील त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येतो. (Bank Overdraft)