ठाकरेंनी एक जागा जिंकून दाखवावी, पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडूण आणावं; भाजपचं खुल चॅलेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत शिंदे गट (शिवसेना) आणि अजित पवार गट (राष्ट्रवादी) भाजप सोबत आल्यामुळे पक्षाची ताकद आणखीन वाढली आहे. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच घासून होणार आहे. अशातच “उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एक तरी जागा जिंकून दाखवावी आणि शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) निवडून आणून दाखवावं” असे खुलं चॅलेंज भाजपाचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिलं आहे.

गिरीश महाजन काय म्हणाले?

गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे, “कुण्या शेंबड्या पोरांचाही विश्वास बसणार नाही की, पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरेंना घाबरलेत म्हणून ते महाराष्ट्र दौऱ्यावर येतायेत. आम्ही सांगितल आहे की 400 पार करणार पण मी त्यांना सांगतो की, उद्धव ठाकरेंनी किमान एक जागा निवडून आणावी आणि पवार साहेबांनी लेक सुप्रिया सुळेंची जागा निवडून आणावी. उगाच मी वाघ आहे, असं दाखवायचं सुरूये. म्हणजेच मांजराने वाघाचं कातडं घातल्यासारखा हा प्रकार आहे”

दरम्यान, आज यवतमाळमध्ये होणाऱ्या महिला बचत गटाच्या महामेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. या मेळाव्यामध्ये त्यांच्याकडून 4900 कोटींच्या कामाचे लोकार्पण आणि शुभारंभ करण्यात येईल. तसेच पंतप्रधान मोदी यावेळी अनेक मोठ्या घोषणा देखील करतील, असे म्हटले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, आगामी निवडणुकीत मत मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदी हा दौरा करत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. विरोधकांच्या याच ठिकाणांना भाजपकडून सडेतोड उत्तर दिले जात आहे.