Wednesday, February 1, 2023

चोरटयांनी चक्क 60 सेकंदात लुटली SBI बँक; दरोड्याचा LIVE VIDEO आला समोर

- Advertisement -

अजमेर : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एक बँक दरोड्याचा (Robbery) व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दरोडेखोरांनी (Robbery) फक्त 50 सेकंदात बँक लुटली आहे. SBI बँकेवर हा दरोडा (Robbery) टाकण्यात आला आहे. फक्त दोघांनी हा दरोडा टाकला आहे. आतापर्यंत तुम्ही चित्रपटात बँक दरोड्याची घटना पहिली असेल. मात्र ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही लाईव्ह दरोड्याचा व्हिडिओ पाहू शकता.

कुठे घडली हि घटना?
राजस्थानच्या पाली जिल्ह्यात हि घटना घडली आहे. जाडन गावातील एसबीआय बँकेत हा दरोडा (Robbery) पडला आहे. या बँकेत दोन सशस्त्र दरोडेखोर बँकेत घुसले. बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी बँक लुटली. हे सगळे त्यांनी फक्त 60 सेकंदात केले. हि दरोड्याची घटना 17 नोव्हेंबर रोजी घडली आहे. हि संपूर्ण घटना बँकेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

- Advertisement -

काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती बँकेत हेल्मेट घातलेली दिसत आहे. तर बँक कर्मचारी आपल्या डेस्कवर बसले आहेत. हेल्मेट घातलेल्या व्यक्तीच्या हातात बंदूक आहे. तो हवेत बंदुकीच्या गोळ्याही झाडतो. कर्मचाऱ्यांना धमकावतो आहे, घाबरवतो आहे. काही वेळाने आणखी एक हेल्मेट घातलेली व्यक्ती येते. जिच्या हातात बॅग आहे. ती व्यक्तीसुद्धा या कर्मचाऱ्यांना धमकी देते. त्यानंतर दोघंही त्या ठिकाणाहून निघून जातो. या दरोडेखोरांनी (Robbery) जवळपास 3 लाख रुपयांची लूट केली आहे. या दरोड्याची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!