Saturday, February 4, 2023

आपण यांना पाहिलंत का? मुंबईत भास्कर जाधवांविरुद्ध बॅनरबाजी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आक्रमक नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे. भास्कर जाधव याना शोधून आणणाऱ्यांना ११ रुपये बक्षीस अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर नेमकं कोणी लावले याबाबत अधिक माहिती नाही पण गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव आणि राणे कुटुंबीय यांच्यातील वादांनंतर हे बॅनर लावण्यात आले आहेत.

नेमका काय आहे बॅनर वरील मजकूर-

मुंबईतील माहीम परिसरात भास्कर जाधव यांच्या विरोधात हे बॅनर लावले गेले आहेत. आपण यांना पाहिलंत का? शोधून आणणाऱ्याला रोख रु. 11/- बक्षिस”, असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे. कालच भास्कर जाधव यांच्या घरावरही अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली होती.

- Advertisement -

दरम्यान, २ दिवसांपूवी भास्कर जाधव यांनी कुडाळ मधील आपल्या जाहीर सभेत राणे कुटुंबीयांची अक्षरशा पिसे काढली होती. नारायण राणेंचा एकेरी उल्लेख करत त्यांनी जोरदार टीका केली होती. त्यांनतर राणेंचे सुपुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत भास्कर जाधव याना प्रत्युत्तर दिले. या एकूण सर्व घडामोडींमुळे राणे विरुद्ध भास्कर जाधव हा वाद चांगलाच उफाळून आला आहे.