Baramati Lok Sabha 2024: बारामतीतून शरद पवार स्वतः लोकसभा लढवणार? राजकीय चर्चांना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बारामती मतदारसंघातून (Baramati Lok Sabha 2024) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नंदन विरुद्ध भाऊजय अशी लढत पाहिला मिळेल या चर्चेने जोर धरला आहे. म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उभ्या राहतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आता या सगळ्या चर्चेमध्ये आणखीन एका विषयाची भर पडली आहे. अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर त्यांना टक्कर देण्यासाठी स्वतः शरद पवार (Sharad Pawar) बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे म्हटले जात आहे.

शरद पवारांनी घेतला आढावा (Baramati Lok Sabha 2024)

मंगळवारी बारामती मतदारसंघाकडे (Baramati Lok Sabha 2024) लक्ष देत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तालुक्याचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पुण्यातील गुलटेकडी येथील निसर्ग मंगल कार्यालयात बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच निवडणुकांना घेऊन कोण कोणती कामे करण्यात येतील यावर भर दिला. शरद पवार यांनी बारकाईने घेतलेल्या या आढाव्यामुळेच सर्वांच्या भवया उंचावल्या गेल्या आहेत.

दरम्यान, बारामती मतदारसंघ (Baramati Lok Sabha 2024) राष्ट्रवादी पक्षांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यातून शरद पवार लोकसभेची निवडणूक लढतील अशी शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. म्हणजेच, आगामी निवडणुकीसाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरताना पाहिला मिळतील. मात्र, या सगळ्यात बारामतीकर शरद पवार यांचा विश्वास कायम ठेवतील की नाही हे पाहणे देखील तितकीच महत्त्वाचे ठरणार आहे.