Baramati Lok Sabha 2024 : सुप्रियाताई बारामतीचा गड राखणार? की अजितदादा शरद पवारांच्या राजकारणाला छेद देणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Baramati Lok Sabha 2024 । बारामती म्हंटल कि आपल्याला दिसते ते म्हणजे पवार कुटुंब….. पवारांच्या संपूर्ण राजकारणाची भिस्त ही बारामतीपासून सुरू होते आणि बारामतीपाशीच येऊन थांबते. इथे पवार कुटुंबातील उमेदवार महाराष्ट्रातील सर्वाधिक लीडनं निवडून येतात बारामतीकरांच्या या प्रेमापोटी बारामती विधानसभेतून अजितदादा आणि लोकसभा मतदारसंघातून सुप्रियाताई वर्षानुवर्ष निवडून येतायत. त्यामुळे इथं विरोधकांचं काही एक चालत नाही. पण यंदा मात्र गोष्ट वेगळी आहे. अजितदादांनी राष्ट्रवादीत वेगळी चूल मांडून घड्याळ तेच वेळ नवी म्हणत पक्षात बंड केलं. त्यामुळे राज्यासह बारामतीचं राजकारणही 360 अंशात फिरलं आहे. उभ्या देशात ज्या नावाचा दरारा आहे त्या पवार कुटुंबाच्या बारामतीतून सलग तीन टर्म खासदार झालेल्या सुप्रिया सुळे यांना अजितदादांच्या बंडामुळे कितपत फटका बसू शकतो

सहा दशकांहून अधिक काळापासून राजकारणात असलेल्या आणि देशाचे एक ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेल्या शरद पवारांच्या पक्षात उभी फूट पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आता पुढे काय होणार? असा प्रश्न सर्वांना पडला. यातला सर्वात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात नेमकं काय बघायला मिळणार? कारण बारामती हा पवार कुटुंबियांचा हा गड मानला जातो. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे तीन टर्मपासून खासदार आहेत. मात्र या प्रत्येक वेळेस ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा त्यांचा दादा असायचा. मात्र आता अजितदादांनी पक्षात फूट पाडून भाजपसोबत केलेल्या घरोब्यामुळे बारामती लोकसभेची समीकरण पुरती बदलली आहेत.

Supriya Sule v/s Sunetra Pawar लढतीत 'या' 5 व्यक्ती ठरणार गेम चेंजर | Baramati Loksabha

गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे जर का असं झालं ही फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर पुऱ्या देशातील हायहोल्टेज निवडणूक होऊ शकते. त्यामुळे यंदा बारामतीच्या राजकारणाचं पाणी प्रस्थापितांनाही चाखायला मिळणार एवढं मात्र नक्की. गेली अनेक वर्षे ही जागा पवारांकडे असल्याने पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची (Baramati Lok Sabha 2024) चांगली बांधणी केली त्यातील सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरतं ते म्हणजे सहकार सहकाराच्या माध्यमातून अनेकांना प्रतिनिधित्व देऊन पवारांनी मतदारसंघातील सहकाराचे जाळे मजबूत केलं.

बारामतीत लोकसभेत कोणाची ताकद किती? Baramati Lok Sabha 2024

ही निवडणूक सुळे यांना खरंच जड जाणार का? हे पाहण्यासाठी थोडं मतदारसंघाचं डिकोडींग करणं सोयीचं राहील. तर बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यात बारामतीतून अजित पवार, दौंडमधून भाजपचे राहुल कुल, (Rahul Kul) सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या खडकवासला मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर, ( Bhimrao Tapkir ) भोर-वेल्हा मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे, ( Sangram Thopate)पुरंदर-हवेली मतदारसंघातून काँग्रेसचे संजय जगताप ( Sanjay Jagtap)आणि इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे ( Dattatray Bharane) आमदार आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा जरी एकहाती असली तरी या मतदारसंघातील विधानसभा या संमिश्र आहेत.

अजितदादा जर का ताईंच्या विरोधात निवडणूक प्रचारात उतरले तर केवळ काँग्रेसच्या आमदारांची त्यांना मदत होऊ शकते. मात्र थोपटेंसोबत शरद पवारांचे संबंध काही खास नसल्याने आणि दुसरीकडे जगताप हे अजितदादांच्या जवळचे असल्याने सुळेंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार असल्याचं अनेक जाणकार मानतात. तरीही सुप्रिया सुळे या अशा परिस्थितीतही दमदार लीड घेतील असं कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात असलं तरी ग्राउंडचं पॉलिटिक्स पाहिलं तर काही वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं. अजितदादा यांच्यानंतर त्यांचा वारस म्हणून अजून कुणीही पॉलिटिकल चेहरा इस्टॅब्लीश झालेला नाहीये. त्यामुळे त्यांच्या घरातून जर का कुणी निवडणुकीच्या मैदानात उतरलं तर सुळे विरुद्ध पवार अशी टफ फाईट आपल्याला पाहायला मिळू शकते. ( Sunetratai Pawar Vs Supriya Sule )

भाजपही राष्ट्रवादीच्या मुळावर घाव घालण्यासाठी आधीपासूनच बारामतीत विशेष लक्ष ठेवून आहेत. म्हणूनच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अमित शाह, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापासून ते राम शिंदे यांचं नेटवर्क बारामतीत जोरदार कामाला लागलंय. मात्र बारामतीत भाजपची संघटनात्मक ताकद तितकीशी नाही किंवा ते केवळ निवडणुकीपुरतं बारामतीकडे पाहतात असं आजपर्यंत दिसून आलं आहे. त्यामुळे यंदा अजितदादा सोबत असल्याने आता बारामतीत अजितदादांच्या ‘ घड्याळ तेच वेळ नवी’ चा नवा ट्रेण्ड सेट होणार? की राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांच्या राजकीय खेळीने सुप्रिया या सगळ्या आव्हानांना पुरून पुन्हा खासदार होणार? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.

अजितदादांना घड्याळ तर शरद पवारांना तुतारी मिळाल्यानंतर बारामती लोकसभा कुणाची? यावरून पवार कुटुंबातच दोन गट पडलेत …सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या सुप्रियाताईंच्या विरोधात 2014 च्या मोदी लाटेत जानकर तर 2019 मध्ये कांचन कुल यांचा पराभव करून ताई हॅट्रिकसाठी मैदानात उतरणार असताना यंदा मात्र नेहमीप्रमाणे पाठीशी असणारा दादाच आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी विरोधात असणारय …सुळेंच्या तुतारीला पवार कुटुंबातून सूनेत्राताई पवार घड्याळाने उत्तर देतील असं गणित जवळपास फिक्स होतंय.. त्यामुळे अजितदादांच्या ग्राउंड नेटवर्कचा फायदा घेत निवडून येणाऱ्या सुप्रिया ताईंना यंदा सुनेत्रा वहिनींचाच विरोध असल्याने त्या मतांचं गणित कसं जुळवून आणतात? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…

मतदारसंघात बारामतीतून अजित पवार, दौंडमधून भाजपचे राहुल कुल, खडकवासल्यात भाजपचे भीमराव तापकीर, भोर-वेल्हा मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे, पुरंदर-हवेलीतून काँग्रेसचे संजय जगताप आणि इंदापूरमधून अजितदादा गटाचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत. अजितदादांचा या आमदारांवर होल्ड चांगला असला तरी शरद पवार यांचा मास केडर आणि सुप्रियाताईंचा जनसंपर्कही मजबूत झालाय.. त्यामुळे सध्यातरी सुप्रियाताई आणि अजित पवार गटाकडून सूनेत्राताई यांना निवडून येण्यासाठी ग्राउंडला दोघांनाही सेम स्कोप असल्याचं दिसतं… त्यामुळे आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला (Baramati Lok Sabha 2024) कुठल्या पवारांना तारणार? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.