बाडमेर : वृत्तसंस्था – गुरुवारी रात्री राजस्थानच्या उत्तरलाई एअरबेसवरून उड्डाण घेतलेले मिग-21 लढाऊ (MiG-21 crash) विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात विंग कमांडर मोहित राणा आणि फ्लाईट लेफ्टनंट अद्वितीय बल हे शहीद झाले. या दोन्ही पायलट्सनी विमानाला आग लागल्यानंतर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत प्रसंगावधान राखल्याने शेकडो जणांचे प्राण वाचले आहेत. मोहित राणा आणि अद्वितीय बल यांनी गुरुवारी रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी मिग-21 (MiG-21 crash) बायसन या विमानातून उड्डाण केले होते. मात्र काही वेळातच विमानामध्ये (MiG-21 crash) तांत्रिक बिघाड झाला आणि विमानाला आग लागली.
यादरम्यान विमान एअरबेसपासून 40 किमीवर भीमडा गावाच्या वर होते. या गावाची लोकसंख्या सुमारे 2,500 एवढी आहे. यावेळी त्या विमानातील पायलट्ससमोर दोनच पर्याय होते. लगेच इजेक्ट करून विमान गावावर पडू द्यावे. मात्र, तसे केले असते तर शेकडो जणांचे प्राण धोक्यात आले असते. दुसरा म्हणजे स्वतःच्या प्राणांचा विचार न करता विमान दूर क्रॅश (MiG-21 crash) करावे. यानंतर या पायलट्सनी क्षणाचाही विचार न करता दुसरा पर्याय निवडत त्यांनी विमान गावापासून दोन किलोमीटरवर निर्मनुष्य परिसरात नेले. तिथे एका टेकडीवर विमान क्रॅश (MiG-21 crash) करण्यात आले.
लोकसंख्येचा अंदाज आला
होताविंग कमांडर मोहित राणा हे मूळचे हिमाचल प्रदेशातील मंडी येथील रहिवासी होते. तर अद्वितीय बल हे जम्मू येथील रहिवासी होते. विमानाला हवेतच आग लागल्यानंतर त्याने गावावरूनच दोन-तीन घिरट्या घातल्या. यावेळी लोकांचा अंदाज आल्यामुळेच दोघांनी विमान उतरवण्यासाठी सुरक्षित जागा शोधली आणि त्या ठिकाणी हे विमान क्रॅश (MiG-21 crash) केले.
हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर