महाराष्ट्रातील मंत्र्यांनो बेळगावात येऊ नका; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी  उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह इतर मंत्री बेळगावचा दौरा करणार आहेत. तत्पूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील या नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. त्यांनी मुख्य सचिवांच्यामार्फत राज्य सरकारला एक पत्र पाठवले आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असे पत्राद्वारे म्हंटले आहे. दरम्यान, सोलापुरात उभारण्यात येणाऱ्या कन्नड भवनासाठी 10 कोटी रुपये देण्याची घोषणा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

अनेकवेळा महाराष्ट्रातील मंत्री आणि नेते यांनी बेळगावमध्ये येण्याची भूमिका घेतली आहे. त्यावेळी जी भूमिका कर्नाटकची होती, तीच भूमिका आजही कायम असल्याचे बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे. चंद्रकांत पाटील आणि इतर मंत्र्याचा 3 नोव्हेंबरला होणारा दौरा हा आत्ता 6 डिसेंबरला होणार आहे. पण आत्ता कर्नाटक सरकारने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकार नेमकं काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पत्रात नेमकं काय म्हंटल आहे?

कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठविलं आहे. त्यामध्ये असे म्हंटल आहे की, महाराष्ट्राचे सीमा भाग समनव्य मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर मंत्र्यानाही कर्नाटकमध्ये येवू नये. महाराष्ट्राच्या मंत्र्यानी बेळगावमध्ये येवू नये यासाठी फॅक्स केला आहे, जर यानंतरही कोणी प्रयत्न केले तर कारवाई केली जाईल असा इशारा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.