प्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; कोबेच्या मुलीसह ९ प्रवाशी ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । अमेरिकेतील लॉस एंजलिस भागात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात कोबे ब्रायंट, त्याची १३ वर्षांची मुलगी आणि इतर ९ प्रवाशांचा मृत्यू झाला. कोबेच्या या अपघाती निधनामुळे क्रीडा जगतावर शोककळा पसरली आहे.

लॉस एंजिलीस येथून उड्डाण केलेल्या हेलिकॉप्टरचा कॅलिफोर्निया भागात ढगाळ वातावरणामुळे अपघात झाला. वातावरणातील बदलामुळे चालकाचं हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. कोबे ब्रायंटचं हे खासगी विमान होतं.

४१ वर्षीय कोबे ब्रायटंने २०१६ साली निवृत्ती स्विकारली. कोबी ब्रायंट हा तब्बल २० वर्षे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये (NBA) सक्रिय होता. आपल्या काळात ब्लॅक मांबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोबेने पाचवेळा संघाला NBA Championship मिळवून दिली होती. आपल्या कारकिर्दीत कोबेने १८ वेळा NBA All Star हा मानाचा किताब पटकावला होता.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा

हे पण वाचा-

अखेर एअर इंडिया कंपनी मोदी सरकारनं काढली विक्रीस

काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान प्रत भेट

बेरोजगारांच्या राष्ट्रीय नोंदणीसाठी युवकाचं आवाहन; नागरिकतेबरोबर नोकरीही गरजेचीच

Leave a Comment