Bastille Day निमित्त भारतीय सैन्याचे फ्रान्समध्ये संचलन; पंतप्रधान मोदींनी दिली सलामी (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फ्रान्समध्ये आज, 14 जुलै रोजी राष्ट्रीय दिन साजरा केला जात आहे. या दिवसाला बॅस्टिल डे म्हणून साजरा केला जातो. परंतु यंदाचा फ्रांसचा राष्ट्रीय दिन भारतासाठी सुद्धा खूप खास आहे. याचे कारण म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याना फ्रांसने प्रमुख पाहुणे म्हणून यंदा निमंत्रित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत फ्रान्सला गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनेही बॅस्टिल डे निमित्त परेड काढली आणि मोदींनी सुद्धा देशाच्या या संचलनाला सलामी दिली.

आज फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत बॅस्टिल डे परेड समारंभात सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी भारतीय लष्कराच्या पंजाब रेजिमेंटला बॅस्टिल डे निमित्त कार्यक्रमात संचलनासाठी बोलावण्यात आले होते. या खास प्रसंगी नरेंद्र मोदींनी भारतीय लष्कराच्या पंजाब रेजिमेंटने संचलन करताना सलामी दिली. याबाबतचा विडिओ सुद्धा समोर आला आहे.

यादरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ट्विट करत म्हंटल कि, जागतिक इतिहासातील एका दिग्गज, भविष्यासाठी निर्णायक भूमिका बजावणारा देश, एक धोरणात्मक भागीदार, मित्र नरेंद्र मोदी यांच्या आजच्या सहभागाने आम्ही भारावून गेलो आहोत. यंदाच्या 14 जुलैच्या परेडसाठी भारताचे सन्माननीय अतिथी म्हणून स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या परेडच्या आदल्या दिवशीच फ्रान्सने पंतप्रधान मोदींना देशातील सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित केले. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान मिळविणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.