महिला क्रिकेटपटुंसाठी बल्ले बल्ले; BCCI ने घेतला मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय महिला क्रिकेटपटुंसाठी मोठी खुशखबर आहे. महिलांना पुरुषांप्रमाणेच समान मानधन देण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे पुरुषांप्रमाणे महिलांनाही कसोटी सामन्यांसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 लाख तर टी-20 सामन्यांसाठी 3 लाख खेळा़डूंना मिळणार आहेत.

जय शाह म्हणाले, भेदभावाचा सामना करण्याच्या दिशेने बीसीसीआयचे पहिले पाऊल जाहीर करताना मला आनंद होत आहे. आम्ही महिला क्रिकेटपटूंसाठी समान वेतन धोरण राबवत आहोत. क्रिकेटमध्ये स्त्री-पुरुष समानतेच्या नव्या युगाची सुरुवात करून पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी मॅच फी समान असेल. बीसीसीआय करारबद्ध खेळाडूंना कसोटी सामन्यांसाठी 15 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यांसाठी 6 लाख रुपये आणि टी-20 सामन्यांसाठी 3 लाख रुपये देईल. आम्ही महिला क्रिकेटपटूंना समान वेतन देण्याचे वचन दिले होते आणि मी त्यांच्या पाठिंब्याबद्दल सर्वोच्च परिषदेचे आभार मानतो असे जय शाह म्हणाले.

 

दरम्यान, भारताची माजी कर्णधार मिताली राज यांनी bcci च्या या निर्णयाचे स्वागत केलं आहे. भारतातील महिला क्रिकेटसाठी हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. पुढील वर्षी बुमन आयपीएल असेल. आम्ही भारतातील महिला क्रिकेटसाठी एका नव्या युगाची सुरुवात करत आहोत. बीसीसीआय आणि शाह सर या निर्णयाबद्दल धन्यवाद असं मितालीने म्हंटल आहे.