औरंगाबाद : गेल्या 24 तासात जिल्ह्यात शनिवारी मनपा हद्दीत 31 आणि ग्रामीण भागात 83 असे एकूण 114 नवे कोरोना बाधितांची भर पडल्याने चिंता वाढली आहे. त्याबरोबरच 8 कारोना ग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला झाला आहे. बरे झालेल्या 156 जणांना सुट्टी देण्यात आली.
आज पर्यंत 140956 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतलेले आहे. आत्ता एकूण कोरोनाबाधीत त्यांची संख्या 1453378 झाली आहे .आज पर्यंत एकूण 3380 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1042 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
शनिवारच्या मृतांमध्ये बीड बायपास येथील 65 वर्षीय पुरुष, चेतना नगर हर्सूल येथील 45 वर्षीय स्त्री, पैठण तालुक्यातील जांभळी येथील 51 वर्षीय पुरुष, ढाकेफळ येथील 50 वर्षीय स्त्री, भवसिंगपुरा औरंगाबाद येथील 81 वर्षीय पुरुष, वैजापूर तालुक्यातील जातेगाव येथील चाळीस 40 वर्षे पुरुष कन्नड तालुक्यातील आडगाव येथील 55 वर्षीय स्त्री, छत्रपती रिलायन्स मॉल येथील 85 वर्षे पुरुषाचा समावेश आहे.