सावधान! औरंगाबादेत कोरोना रुग्णसंख्येत वाढ

0
25
Corona Test
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद |  गेल्या आठवड्यापासून शहरातील रुग्णसंख्याचे प्रमाण दहाच्या आत होते. पण या आठवड्याच्या अखेरीस शहरात मनपा हद्दीत 23 रुग्णांची भर पडली आहे. आता हा आकडा 34 वर गेला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात 17 जणांना (मनपा 8 ग्रामीण 9) शनिवारी सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत एक लाख 44 हजार 283 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेली आहेत. 34 करोनाबाधित रुग्णांची यात नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता एक लाख 47 हजार 983 वर जाऊन पोहोचली आहे.

त्यामध्ये मनपा हद्दीतील सातारा पोलीस स्टेशन परिसर 1, हर्सृल परिसर 12, चिकलठाणा 1, महाजन कॉलनी 1, बीड बायपास 3, तापडिया नगर 1, कुंभारवाडा परिसर 2, होनाजी नगर 2, शिवाजीनगर 1, तर ग्रामीण भागातील औरंगाबाद तालुक्यातील तालुक्यात 4 गंगापूर 4 वैजापूर एक तर पैठणमध्ये 2 रुग्ण संख्या असे रुग्ण वाढले आहेत. आणि दिलासादायक बाब म्हणजे ही दिवसभरात एकही करून आत रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here