पावसाच्या दिवसात रतन टाटांचा चालकांना महत्त्वाचा सल्ला; वाचून तुम्हांलाही वाटेल अभिमान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टाइम्स मराठी । पावसापासून वाचण्यासाठी अनेक पाळीव प्राणी निवारा शोधत असतात. बऱ्याचदा हे पाळीव प्राणी गाड्यांच्या खाली जाऊन बसतात. हे आपल्याला माहित नसल्यामुळे आपण भन्नाट गाडी काढतो. पण त्या प्राण्यांना यामुळे इजा पोहोचू शकते. त्यामुळे आपल्याला पावसाळ्यात गाडी चालवण्यासोबतच आपल्या गाडीखाली बसलेल्या पाळीव प्राण्याची देखील काळजी घेतली पाहिजे. देशाचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी हीच गोष्ट सर्व चालकांना सांगितली आहे.

याबात रतन टाटा यांनी सोशल मीडियावर एक महत्त्वाची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मधील मेसेजच्या माध्यमातून त्यांच्यातील प्राणी प्रेम आणि दयेची भावना दिसून आली. त्यांनी या मेसेजमध्ये सांगितलं की, तुम्ही कारचे इंजिन सुरू करण्यापूर्वी कार खाली बसलेल्या पाळीव प्राण्यांकडे लक्ष द्या, पाऊस पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ते आसरा शोधत असतात. आणि गाड्यांच्या खाली जाऊन बसतात. अचानक गाडी सुरू केल्यामुळे त्यांना दुखापत होऊ शकते. यामुळे रतन टाटा यांनी पावसाळ्यात प्राण्यांची काळजी घेण्याची विनंती केली आहे.

रतन टाटा यांनी सोशल मीडियावर ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करत लिहिलं की, पावसाळा सुरू झाला असून निवारा शोधण्यासाठी कुत्रे आणि मांजर बरेचदा कारच्या खाली बसून राहतात. मुळे कार चालवताना एकदा कार च्या खाली नक्की बघा. त्यामुळे कारच्या खाली बसलेल्या जनावरांना कोणतेही दुखापत होणार नाही. आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू देखील होणार नाही. त्यांनी ट्विटर वर शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून लोकांकडून रतन टाटा यांचे कौतुक करण्यात येत आहे. रतन टाटा चारिटी साठी देखील काम करतात. त्यांच्या मनात पाळीव प्राण्याविषयी खूप प्रेम आहे.