गजानन महाराज म्हणून फिरणाऱ्या अवलियाला मारहाण; Video Viral

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या शेगावात प्रत्यक्षात संत गजाजन महाराज प्रकटले असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. परंतु हे कोणी गजानन महाराज नसून एक व्यक्ती वेष धारण करून गावात संचार करत असल्याचे नंतर सर्वांसमोर आले. त्यामुळे स्थानिकांनी या व्यक्तीला गावातून काढून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, आता वेष बदलून फिरणाऱ्या व्यक्तीविषयी नागरिकांच्या मनात एवढा राग निर्माण झाला आहे की, या व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची नुकतीच घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शेगावात संत गजानन महाराज प्रकटल्याची बातमी संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली होती. परंतु काही काळातच हा एक सामान्य व्यक्ती असून तो संत गजानन महाराज यांचे रूप धारण करून फिरत असल्याचे समोर आले. ज्यामुळे आता नागरिकांच्या मनात देखील या व्यक्तीविषयी संताप निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे, याकारणामुळेच गजानन महाराज यांचे वेश घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बुलढाणा परिसरात हा व्यक्ती फिरत असताना त्याला एका  स्थानिक तरुणाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी या व्यक्तीने त्याला प्रतिकार केला. आता याच सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गजानन महाराजांचे वेश घेऊन फिरणाऱ्या या व्यक्तीकडे लातूर जिल्ह्यातील घुग्गी येथील शेषराव रामराव बिराजदार नामक व्यक्तीचे बँक पासबुक ही सापडले आहे. मात्र अद्याप बुलढाणा पोलिसांकडून या व्यक्तीची कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाहीये. हा व्यक्ती स्वतःला संत गजानन महाराज असल्याचे म्हणत लोकांना फसवण्याचे काम करत आहे. परंतु तरीदेखील या व्यक्तीवर बुलढाणा पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. तसेच, हा व्यक्ती स्वतःला गजानन महाराज का म्हणत आहे? त्यांच्या वेशभूषेत का फिरत आहे? हे देखील अद्याप उघडकीस आलेले नाहीये. या सर्व प्रकारामुळे नागरिकांच्या भावना देखील दुखावल्या गेल्या आहेत.