भर लग्न मंडपात नवरदेवाला मारहाण; कारण ऐकून तुम्हांलाही बसेल धक्का (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण सर्वांनीच अभिनेता आयुषमान खुरानाचा बाला चित्रपट पाहिला आहे. या चित्रपटात त्यांची बायको त्यांला तो टकला असल्यामुळे सोडून जाते. मात्र तुम्ही कधी असा विचार केला आहे का अशी घटना वास्तवात देखील घडू शकते. बिहारमध्येच अशाच एका कारणामुळे नवरदेवाला मारहान करण्यात आल्याची  घटना घडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना डोभी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या बाजौरा गावात घडली आहे. व्हिडीओमुळे व्हायरल झालेला नवरदेव फसवणूक करुन दुसरे लग्न करण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच त्याच्या पहिल्या लग्नाची माहिती मुलीच्या घरच्यांना समजली. त्यामुळे त्यांनी मांडवातच नवरदेवाला मारहाण करायला सुरुवात केली.

पुढे यावरच न थांबता त्यांनी नवरदेवाला शिक्षा म्हणून त्याचे मुंडण करण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी तो टकला असल्याचे सर्वांसमोर उघड झाले. आपल्या लग्नासाठी नवरदेवाने चक्क बनावट केस लावले होते. हे पाहून नवरीला देखील धक्का बसला. त्यामुळे हे लग्न इथेच मोडले गेले.

https://www.instagram.com/reel/CulcNGApd7F/?igshid=MzRlODBiNWFlZA==

यानंतर नवरदेवाने कुटुंबाची माफी मागितली. परंतु त्याचे कोणीही ऐकले नाही. तसेच त्याला मारहाण ही करण्यात आली. मात्र या सगळ्यात मुलीचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचले. सध्या या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. मुख्य म्हणजे, अशी देखील फसवणूक होऊ शकते याचे अनेकांना आश्चर्य वाटले आहे.