Beauty Tips : माथ्यावरचे केस झालेत पांढरे ? केसांना डाय न लावता अशा पद्धतीने करा काळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Beauty Tips : बदलती जीवनशैली, बदलता आहार, प्रदूषण अशा काही घटकांमुळे केस पांढरे होण्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्यातही अकाली केस पांढरे होण्याच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला पाहायला मिळत (Beauty Tips) असतीलच . अगदी शाळेला जाणारी मुला – मुलींचे सुद्धा आता केस पांढरे होताना दिसत आहेत.

पांढऱ्या केसांमुळे वय जास्त दिसू लागते. परिणामी आत्मविश्वास कमी होतो. मग आपोआपच अनेक लोक हे हेअर डाय ,केमिकल युक्त डायच्या आहारी जातात. पण हे केमिकल युक्त डाय आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी ही हानिकारक असतात. म्हणूनच आम्ही आजच्या लेखांमध्ये असे काही हेअर पॅक तुम्हाला सांगणार आहोत जे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. शिवाय हे हेअरमास्क लावण्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. शिवाय नैसर्गिकरीत्या केस काळे होण्यास मदत होणार आहे चला तर मग (Beauty Tips) जाणून घेऊया…

भृंगराज आणि नारळाचं तेल (Beauty Tips)

  • नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार संशोधनातून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की एकलिप्त अल्वा म्हणजे भृंगराज केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतो.
  • हा हेअर मास्क तयार करण्यासाठी एका भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये भृंगराज पावडर घाला.
  • त्यानंतर हे मिश्रण एकजीव करून थंड करून घ्या
  • नंतर हे मिश्रण गाळून एका बाटलीमध्ये भरा.
  • आता हे मिश्रण तुम्हाला केस आणि स्कॅल्प वर लावायचा आहे.
  • सकाळी उठल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. भृंगराज केसांना नैसर्गिक रंग देतो आणि नारळाचा तेल केसांमधील प्रोटीन वाढवतात. त्यामुळे केस पांढरे होण्याच्या समस्या पासून सुटका मिळेल.

आवळा आणि मेथी (Beauty Tips)

आवळ्यामध्ये विटामिन सी असते जे केसांच्या मेलॅनिनचे उत्पादन वाढवते. मेथीच्या बियांमध्ये अमिनो ऍसिड असतात. ज्यामुळे पांढरे केस रोखण्यास मदत होते.

  • आवळा आणि मेथी असलेला हेअरमास्क बनवण्यासाठी एका कढईमध्ये ऑलिव्ह ऑइल व्यवस्थित गरम करून घ्या.
  • त्यामध्ये मेथी आणि आवळा यांची पावडर घालून मिक्स करून घ्या
  • हे मिश्रण थंड झाल्यानंतर एका काचेच्या बाटलीमध्ये भरा
  • हे मिश्रण केसांना रात्रभर तसेच राहू द्या
  • आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शाम्पू न हेअर वॉश (Beauty Tips) करून घ्या.