Beauty Tips : तुकतुकीत कोरियन ग्लास स्किन हवीय ? मग बनवा होम मेड आइस क्यूब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Beauty Tips : आपल्याला माहितीच असेल की कोरियन ड्रामा जगभर किती ट्रेंड मध्ये आहे. अगदी त्याचप्रमाणे कोरियन स्किन सुद्धा जगभर ट्रेंड मध्ये आहे. तुकतुकीत , डाग विरहित आणि काचेसारखी चकाकी देणारी नॅचरल स्किन कुणाला हवीहवीशी वाटणार नाही.

जर तुम्ही कोरियन ब्युटी प्रोडक्ट बाजारात घ्यायला गेलात तर त्याची किंमत परवडणारी नसते. वारंवार हे प्रोडक्ट वापरण्यासाठी खर्चिक आहेत म्हणूनच आम्ही आज तुम्हाला कोरियन स्किन बाबत होम रेमिडी सांगणार आहोत जी आजकाल ट्रेंडमध्ये आहेत, त्यापैकी एक म्हणजे ग्लास स्किन (Beauty Tips) आइस क्यूब. चला तर मग जाणून घेऊया…

कोरियन स्किन केअर प्रॉडक्ट मध्ये तांदळाचे पाणी आणि तांदूळ हे अतिशय कॉमन आणि महत्त्वाचा घटक आहेत. कोरियन स्त्रीया त्यांच्या रोजच्या स्क्रीन केअर रुटीन मध्ये तांदळाचे पाणी वापरतात. सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध (Beauty Tips) असलेलं तांदळाचे पाणी तुमच्या सौंदर्यात मोठी भर घालू शकते. तुम्हाला सुद्धा सुंदर ग्लोइंग आणि नितळ त्वचा हवी असेल तर तांदळाच्या पाण्यापासून बनवलेलं राईस वॉटर आईस क्यूब तुम्ही वापरू शकता. चेहरा हायट्रेटेड आणि फ्रेश ठेवण्यासाठी तांदळाच्या पाण्यापासून तयार केलेले आईस क्यूब फारच उपयोगी ठरतात. ते कसे तयार (Beauty Tips) करायचे पाहूयात.

  • सर्वप्रथम, एक ग्लास तांदूळ उकळल्यानंतर तुम्हाला उरलेले पाणी (Beauty Tips) लागेल.
  • आता त्यात एक चमचा ग्लिसरीन घाला.
  • आता त्यात एक चमचा एलोवेरा जेल टाका आणि फेटून घ्या.
  • आता त्यात दोन व्हिटॅमिन ई कॅप्सूल कापून घ्या.
  • आता या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे फेटा.
  • आता हे तयार मिश्रण फ्रीजरमधील (Beauty Tips) आइस क्यूब ट्रेमध्ये काळजीपूर्वक ओता.
  • तुमचे होममेड स्किन केअर आइस क्यूब तयार आहे. तुम्ही हे मोठ्या प्रमाणात बनवू शकता आणि महिनाभर (Beauty Tips) साठवून ठेवू शकता आणि दररोज वापरू शकता.

कसे वापराल ?

  • रात्री एक बर्फाचा तुकडा घ्या आणि स्वच्छ चेहरा आणि मानेवर पूर्णपणे मसाज करा.
  • आता किमान 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या.
  • नंतर कोमट पाण्याने नीट धुवा.
  • एक दिवस आड या बर्फाच्या क्यूबने तुमचा चेहरा आणि मान मसाज करा.
  • हे लावल्यानंतर चेहऱ्यावर खाज सुटली किंवा जळजळ होत असेल तर लगेच वापरणे (Beauty Tips) बंद करा.