T20 वर्ल्डकप साठी भारताचा कर्णधार ठरला!! BCCI ची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये (T20 World Cup 2024) टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार असल्याची मोठी घोषणा बुधवारी बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह यांनी केली आहे. याची माहिती आयसीसीने बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात दिली आहे. आता रोहित शर्माकडे (Rohit Sharma) कॅप्टनची मोठी जबाबदारी सोपवल्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व कोण करेल असा प्रश्न विचारला जात होता. मात्र आता ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवल्यामुळे सर्व प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे.

जय शहा काय म्हणाले?

जय शाह यांनी म्हटले की “2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात आपला पराभव झाला असला तरी टीम इंडिया चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरली होती. भारताने सलग 10 सामने जिंकले. मला पूर्ण विश्वास आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया यंदाचा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी होईल” बीसीसीआयने हा विश्वास दाखवतच टीम इंडियाची कॅप्टन्सी रोहित शर्माला दिली आहे. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया कशी बाजी मारेल हे पाहणे रोमांचक असणार आहे.

मुख्य म्हणजे, यापूर्वी टीम इंडियाची कॅप्टन्सी हार्दिक पंड्या याच्याकडे देण्यात येईल अशी देखील चर्चा रंगली होती. मात्र कॅप्टन्सी रोहित शर्मा कडे आल्यामुळे हार्दिक पंड्या याला उपकर्णधार पदावर समाधान मानावे लागले आहे. या दोन्ही खेळाडूंकडे सोपवण्यात येणाऱ्या जबाबदारीची घोषणा 14 फेब्रुवारी रोजी सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमच्या नामांतर कार्यक्रमात करण्यात आली आहे.

दरम्यान, टी 20 वर्ल्ड कप 2024 अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तरित्या आयोजित करण्यात आला आहे. या वर्ल्ड कप 2024 चे सामने 1 ते 29 जून दरम्यान रंगतील. टीम इंडिया चा पहिला सामना 5 जून रोजी न्यूयॉर्क येथे आयर्लंड विरुद्ध होईल. तर चार दिवसांनी टीम इंडिया पाकिस्तानसह मुकाबला करेल. त्यामुळे हे सामने सुरू होण्यासाठी क्रिकेट प्रेमी आणि रोहित शर्माचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.