LIC च्या ‘या’ योजनेत फक्त 296 रुपये गुंतवून व्हा लखपती; जाणून घ्या सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणून LIC कडे पाहिले जाते. LIC आपल्या ग्राहकांसाठी नेहमी वेगवेगळ्या योजना आणि स्किम राबवत असते. या योजनांना ग्राहकांना देखील तितकाच फायदा होत असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशीच एक तुमच्या फायद्याची LIC ची योजना सांगणार आहोत.. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला काही वर्षातच लाखो रुपये मिळून जातील. ज्यामुळे तुम्ही झटक्यात श्रीमंत व्हाल. चला तर मग जाणून घेऊयात या नविन योजनेविषयी सविस्तर माहिती.

जीवन लाभ योजना

सध्या LIC कंपनी जीवन लाभ योजनेच्या माध्यमातून सर्वांना श्रीमंत बनवण्यासाठी काम करत आहे. जर तुमचे वय 25 असेल आणि या योजनेमध्ये तुम्ही 25 वर्षांसाठी सामील असाल तर तुम्हाला पुन्हा गुंतवणूक करावी लागेल, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 296 रुपये भरावे लागतील. अश्याने तुम्ही महिन्याला 8893 रूपये जीवन लाभ योजनेत गुंतवताल. ही रक्कम एका वर्षासाठी 1,04,497 रुपये असेल. मात्र या काळात अचानक पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर, या योजनेचा लाभ कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सहज घेता येईल. LIC योजनेची आर्थिक रक्कम पॉलिसी धारकाच्या कुटुंबाला देण्यात येईल. परंतु पॉलिसी धारक योजनेचा काळ पूर्ण होईपर्यंत जिवंत असला तर एकरकमी रक्कम दिली जाईल.

फायदे

जीवन लाभ योजना ही कोणत्याही शेअर बाजारावर अवलंबून नसल्यामुळे ती ग्राहकांसाठी सर्वात सुरक्षित मानली जाते. तुम्ही जर वयाच्या 25 व्या वर्षी या पॉलिसीचा लाभ घेतला तर तुम्हाला तिच्या मॅच्युरिटीवर 54 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळेल. त्याचबरोबर योजनेचे प्रीमियम पहिल्या 3 वर्षांसाठी नियमितपणे भरल्यास या पॉलिसीवर सहज कर्ज देखील मिळू शकते. यात इन-फोर्स पॉलिसींसाठी सरेंडर व्हॅल्यूच्या 90% जास्तीत जास्त कर्ज मिळू शकते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या पॉलिसी धारकाला कव्हरसह बचतीचा ही लाभ घेता येतो. त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करता जीवन लाभ योजना सर्वात जास्त फायदेशीर ठरते.